UP: इस्लाम धर्म नव्हे,1400 वर्षांपूर्वी तयार झालेला दहशतवादी गट! हिंदू धर्माची दीक्षा घेतल्यानंतर वसीम रिझवी यांचे वक्तव्य!

उत्तर प्रदेशच्या शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिझवी यांनी इस्लाम धर्मातून हिंदू धर्मात प्रवेश केल्यानंतर वादग्रस्त वक्तव्य केले. इस्लाम हा धर्म नसून 1400 वर्षांपूर्वी अरबमध्ये तयार झालेला दहशतवादी गट आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे, यावरून आणखी वादंग होण्याची शक्यता आहे.

UP: इस्लाम धर्म नव्हे,1400 वर्षांपूर्वी तयार झालेला दहशतवादी गट! हिंदू धर्माची दीक्षा घेतल्यानंतर वसीम रिझवी यांचे वक्तव्य!
वसीम रिझवी यांचा इस्लाम धर्मातून हिंदू धर्मात प्रवेश

गाझियाबादः शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिझवी (Wasim Rizvi) यांनी इस्माल धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला आहे. सोमवारी सकाळी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद (Gaziabad) येथील डासना मंदिरात यति नरसिंहानंद सरस्वती यांनी वसीम यांना सनातन धर्माची दीक्षा दिली. हिंदू धर्मात प्रवेश केल्यानंतर लगेच वसीम रिझवी यांनी मोठे विधान केले. ते म्हणाले, मला इस्लाममधून (Islam)बहिष्कृत करण्यात आले आहे. माझ्यावर दर शुक्रवारी इनाम ठेवले जात होते. आज मी सनातन धर्म (Sanatan ) स्वीकारत आहे. यति नरसिंहानंद सरस्वती म्हणाले की, वसीम रिझवी त्यागी जातीत प्रवेश करतील. त्यांचे नवे नाव जितेंद्र नारायणसिंह त्यागी असे ठेवण्यात आले आहे.

इस्लाम हा धर्म नाही, एक दहशतवादी समूह- रिझवी

धर्मांतर करताना वसीम रिझवी म्हणाले, हे धर्मांतर नव्हे. मला इस्लाममधून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे पुढे कोणता धर्म स्वीकारायचा, ही माझी मर्जी आहे. सनातन धर्म हा जगातील सर्वत पहिला धर्म असून त्यात मानवतेशी निगडीत असंख्य चांगल्या गोष्टी आहेत. आम्ही इस्लामला धर्म मानतच नाहीत. मोहम्मद साहेबांनी बनवेला इस्लाम धर्म वाचल्यानंतर आणि त्याचा दहशतवादी चेहरा पाहिल्यानंतर मला हे कळले. इस्लाम हा एखादा धर्म नाही तर एक दहशतावदी गट आहे, जो 1400 वर्षांपूर्वी अरबमध्ये तयार झाला होता. दर शुक्रवारी नमाजनंतर माझे डोके उडवण्यास सांगितले जाते. मला मुस्लिम मानण्यास त्यांना शरम वाटते. त्यामुळे मी सनातन धर्म स्वीकारत आहे.

कोण आहेत वसीम रिझवी?

वसीम रिझवी हे उत्तर प्रदेशातील शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन आहेत. कुराणातील 24 आयतींवर आक्षेप घेत त्या हटवण्याची मागणी केल्यानंतर ते चर्चेत आले होते. यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात केलेली याचिका फेटाळली गेली. 2000 साली रिझवी हे लखनौच्या काश्मिरी मोहल्ल्यातून सपाच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर 2008 मध्ये ते शिया वक्फ बोर्डाचे मेंबर झाले. 2012 साली त्यांची सपातून हकालपट्टी झाली. रिझवी हे आधीपासूनच कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर आहेत. कुराणातील 26 आयती मुस्लिमांमध्ये हिंसेला खतपाणी घालतात, त्या मूळ कुराणाचा भाग नव्हत्या, नंतर त्या जोडल्या गेल्या, अशी भूमिका रिझवी यांनी घेतली होती. त्यानंतर शिया आमि सुन्नी दोन्हींचे मौलवी रिझवींवर तुटून पडले होते. तसेच रिझवींचं डोकं छाटणाऱ्याला 10 लाख रुपये आणि हजची मोफत ट्रिप दिली जाईल, असं बक्षीस बरेलीची संघटना ऑल इंडिया फैजन ए मदिना कौंसिलनं जाहीर केलं.

मृत्यूनंतर दफन नव्हे दहन करावे- रिझवी

काही दिवसांपूर्वी वसीम रिझवी यांनी मृत्यूपत्र सार्वजनिक केले होते. त्यात त्यांनी घोषणा केली होती की, माझ्या मृत्यूनंतर मला दफन न करता हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले जावे. तसेच माझ्या शरीराचे दहन केले जावे. यति नरसिंहानंद यांनीच माझ्या चितेला अग्नी देण्याची इच्छाही त्यांनी प्रकट केली आहे.

इतर बातम्या-

कोण आहेत वसिम रिझवी, जे इस्लाम सोडून हिंदू धर्माची आज दिक्षा घेणार? का वादात आहेत?

Special News| डॉ. आंबेडकरांचा काळाराम मंदिर सत्याग्रह, येवल्यातली धर्मांतर घोषणा अन् अशी झाली रक्तहीन क्रांती!

Published On - 1:05 pm, Mon, 6 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI