Video | ‘भाsssग प्रदीप भाग…’ केविन पीटरसन आणि देशातील दिग्गज नेत्यांसह अनेकजण प्रदीपला पाहून भारावले!

Video | 'भाsssग प्रदीप भाग...' केविन पीटरसन आणि देशातील दिग्गज नेत्यांसह अनेकजण प्रदीपला पाहून भारावले!
प्रदीप मेहराला पाहून पीटरसनही भारावला!
Image Credit source: Twitter Video Grab

Pradeep Mehra : सलग दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता प्रदीप धावत आपल्या घराच्या दिशेनं निघाला होता. यावेळीही त्याची दौड, अनेकांना प्रेरणा देन गेली. विनोद कापरींनी शेअर केलेल्या 2 मिनिटं 18 सेकंदाच्या या व्हिडीओला जवळपास पावणे चार लाखापेक्षा जास्त लोकं पाहून झाली आहेत.

सिद्धेश सावंत

|

Mar 21, 2022 | 3:50 PM

नवी दिल्ली : प्रदीप मेहरा. (Pradeep Mehra) दोन दिवसांपूर्वी 19 वर्षांचा हा मुलगा कुणीच नव्हता.  त्याचा एक धावतानाचा व्हिडीओ विनोद कापरींनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड काय केला… त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा काय मारल्या.. आणि बघता बघता हा मुलगा ट्वीटरवर Trend होऊ लागला. ज्या वेगानं हा मुलगा 10 किलोमीटर धावत सुटलाय, त्याच्यापेक्षा जास्त वेगानं, त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय! या सगळ्याची कल्पना ना प्रदीपनं केली असेल आणि ना विनोद कापरींनी. (Vinod Kapri) पण प्रदीपची गोष्ट पाहून अनेकांना त्यानं प्रभावित केलं. वृत्तवाहिन्यांना त्याचे एक्स्क्लुझिव्ह इंटरव्हू (Pradeep Mehra Exclusive) करावेसे वाटले. हे सगळं कौतुकास्पद जरी असलं, तरी याचा अतिरेकही होऊ नये म्हणजे मिळवलं. आता खरंतर त्यासाठीही विनोद कापरींना आवाहन करावं लागलंय.. पण त्याआधी सलग दुसऱ्या दिवशी विनोद कापरींनी या मुलाची मॅकडोनल्डमध्ये भेट घेतली. त्याला लोकांनी किती भरभरुन प्रेम दिलंय, याबद्दलही सांगितलं. यावेळी प्रदीपच्या डोळ्यात, त्याच्या देहबोलीतली शालीनता अगदी तशीच होती, जशी याआधीच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाली होती. हा प्रदीप नेमका कोण आहे, त्याची गोष्ट आम्ही तुम्हाला या आधीच सांगितली होती. ती तुम्हाला इथे वाचायला मिळू शकेल.

सलग दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता प्रदीप धावत आपल्या घराच्या दिशेनं निघाला होता. यावेळीही त्याची दौड, अनेकांना प्रेरणा देन गेली. विनोद कापरींनी शेअर केलेल्या 2 मिनिटं 18 सेकंदाच्या या व्हिडीओला जवळपास पावणे चार लाखापेक्षा जास्त लोकं पाहून झाली आहेत. हजारो लोकांनी हा व्हिडीओ शेअर केलाय.

पाहा व्हिडीओ :

इंग्लंडचा माजी क्रिकेटर ऑल राऊंडर केविन पीटरसनलाही या मुलानं चकीत केलंय. प्रदीपचा व्हिडीओ पाहून केविन पीटरनसही भारावून गेलाय. फक्त केविन पीटरसनच नव्हे, तर दिग्विजय सिंह, धमेंद्र प्रधान यांच्यासहह वेगवेगळ्या आज-माजी आयएएस अधिकाऱ्यांनाही या मुलानं प्रभावित केलंय. अनेकांनी या मुलाचा व्हिडीओ रिट्वीट करत त्याचं कौतुक केलंय.

पीटरसन काय म्हणाला, पाहा :

दिग्विजय सिंह काय म्हणाले?

धमेंद्र प्रधान यांनी काय म्हटलं?

‘धावण्याचा सराव करण्यासाठी काही तरा करा, सरकार!’

वाचा प्रेरणादायी बातम्या :

भावा जिंकलस! इशानच्या भावानं त्याच्यासाठी केलेला त्याग हा इशानला लावलेल्या बोलीपेक्षा मोठाय

रस्त्यावरुन धावत सुटला, लिफ्टसाठीही नको म्हणाला! त्याच्या नकार देण्याचं कारणं फार अर्थपूर्ण आहे, नीट समजून घ्या

दोनदा संधी हुकली, तिसऱ्यांदा जिद्दीलाच पेटला! ऊसतोड कामगार PSI बनण्याचा प्रेरणादायी प्रवास

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें