AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed | दोनदा संधी हुकली, तिसऱ्यांदा जिद्दीलाच पेटला! ऊसतोड कामगार PSI बनण्याचा प्रेरणादायी प्रवास

कृष्णा कावळे याची दोन वेळा या पदापर्यंतची संधी हुकली, मात्र त्याने माघार घेतली नाही. अखेर तिसऱ्या प्रयत्नात त्याने यशाला गवसणी घातलीच त्याचा हा प्रवास ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी हा प्रेरणादायी ठरत आहे.

Beed | दोनदा संधी हुकली, तिसऱ्यांदा जिद्दीलाच पेटला! ऊसतोड कामगार PSI बनण्याचा प्रेरणादायी प्रवास
PSI बनलेल्या कृष्णाचा कावळेचीवाडी गावकऱ्यांतर्फे सत्कारImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 17, 2022 | 3:26 PM
Share

बीडः बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा (Sugarcane Workers) जिल्हा म्हणून ओळखला जातो. आता याच जिल्ह्यात ऊसतोड मजुरांची मुलं अधिकारी होताना दिसून येत आहेत. परळी तालुक्यातील कावळेचीवाडी या गावात राहणाऱ्या कृष्णा गोविंदा कावळे (Krushna Govinda Kawale) या मुलाची कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे. कृष्णा यांचे आई-वडील हे ऊसतोड मजूर आहेत. आणि याच ऊसतोड मजुराच्या मुलाने पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली आहे. खाजगी कंपनी काम करत असताना अभ्यास करून त्याने अखेर हे यश संपादन केलंय. विशेष म्हणजे कावळेचीवाडी गावातील कृष्णा हा पहिला अधिकारी बनलाय. त्यामुळे अवघ्या गावात त्याचं कौतुक होतंय.  गावातील लोकांनी कृष्णा कावळे यांचे गावात जंगी स्वागत करून गावातीलच एक हक्काचा व्यक्ती अधिकारी झाल्याने ग्रामस्थ देखील आनंदी आहेत.

कष्टानं यश कमावलं, आईला आनंदाश्रू…

कृष्णाच्या घरी केवळ चार एकर शेतजमीन… आई-वडील, भाऊ, बहीण असा कृष्णाचा परिवार… आई वडील मजुरी आणि ऊसतोडी करून आपला उदरनिर्वाह भागवतात, याच परिस्थितीत आई-वडिलांच्या सोबत दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून आणि खाजगी कंपनी मध्ये काम करून करून कृष्णाने आपले शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीचा सामना करून जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्याने घामाचे मोती करून यश मिळवल्याने त्याच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसून आले.

कावळेचीवाडी गावातला पहिला अधिकारी

कावळेचीवाडी गावातील कृष्णा हा पहिला अधिकारी झालाय. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी कृष्णा कावळे यांचे गावात जंगी स्वागत करून गावातीलच एक हक्काचा व्यक्ती अधिकारी झाल्याने ग्रामस्थ देखील आनंदी आहेत. कृष्णा कावळे याची दोन वेळा या पदापर्यंतची संधी हुकली, मात्र त्याने माघार घेतली नाही. अखेर तिसऱ्या प्रयत्नात त्याने यशाला गवसणी घातलीच त्याचा हा प्रवास ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी हा प्रेरणादायी ठरत आहे.

इतर बातम्या-

Cricket : बाबर आझमचं ऑस्ट्रेलियविरुद्ध शतक, विराट कोहली होतोय ट्रोल, काय आहे विराट ट्रोल होण्यामागचं कारण?

मुख्यमंत्रिपदाबाबत विचारल्यावर का भडकले विश्वजीत राणे? गोव्याच्या राजकारणात चाललंय काय?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.