AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारायण राणे, अर्जुन खोतकर, ज्योतिरादित्य आणि वॉशिंग पॉवडर… Welcome To Amit Shah… पोस्टर लावून भाजपवर निशाणा

दिल्लीतील अबकारी नीती घोटाळ्याप्रकरणी ईडीने के कविता यांची शनिवारी 9 तास चौकशी केली. त्यांना 16 मार्च रोजी पुन्हा एकदा चौकशीला येण्यास सांगितलं आहे. कविता यांनी हैदराबादमध्ये मिटिंग घेतली होती.

नारायण राणे, अर्जुन खोतकर, ज्योतिरादित्य आणि वॉशिंग पॉवडर... Welcome To Amit Shah... पोस्टर लावून भाजपवर निशाणा
poster warImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 12, 2023 | 9:31 AM
Share

हैदराबाद : तेलंगणामध्ये बीआरएस आणि भाजपमधील वाद काही संपताना दिसत नाहीये. दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. दोन्ही पक्ष जणू एकमेकांवर तोंडसुख घेण्याची संधीच शोधत असतात की काय अशा प्रकारचं चित्र या राज्यात पाहायला मिळतंय. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तेलंगणात आले आहेत. शाह तेलंगणात आल्यावर बीआरएसने त्यांचं अनोख्या पद्धतीने स्वागत केलं. केसीआर यांच्या या पक्षाने थेट निरमा वाशिंग पावडरच्या जाहिरातीच्या थीमवर शाह यांचं स्वागत केलं आहे. या पोस्टरवर निरमा वॉशिंग पावडरची जाहिरात करण्यात आली आहे. त्यावर भाजपमधील भ्रष्टाचारी नेत्यांची नावे लिहिली आहेत. आणि वेलकम टू अमित शाह… असं म्हटलं आहे. सध्या हे पोस्टर तेलंगणात चर्चेचा विषय ठरलं आहे.

ईडीकडून केसीआर यांच्या पक्षाच्या आमदाराच्या मुलीची चौकशी करत आहे. त्यामुळे बीआरएस पक्षाकडून संताप व्यक्त केला जात आहे. आमच्या लोकांची ईडीकडून चौकशी केली जाते. मात्र, भाजपमध्ये गेलेल्यांची चौकशी होत नाही. तुमच्याकडे काय निरमा वॉशिंग पावडर आहे काय? अशा शब्दात सुनावण्यासाठी हे पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरवर वाशिंग पावडर निरमा असं लिहिलं आहे. त्यानंतर पोस्टरवर निरमाच्या जाहिरातीतील मुलीचे आठ फोटो छापण्यता आले आहेत.

प्रत्येक फोटो खाली भाजपमधील भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांची नावे लिहिली आहेत. हिमंत बिस्वा सरमा, नारायण राणे, सुवेंदु अधिकारी, सुजाना चौधरी, ईश्वरप्पा, ज्योतिरादित्य सिंधिया आणि अर्जुन खोतकर यांची नावे लिहिली आहेत. त्यानंतर सर्वात शेवटी ठळक अक्षरात ‘Welcome Amit Shah यानी अमित शाह यांचं स्वागत आहे’, असं लिहिलं आहे.

अन् चौकश्या थांबल्या

अशाच प्रकारचे पोस्टर शनिवारी ही लावण्यात आले होते. निरमा वाशिंग पावडरच्या थीमवर हे पोस्टर लावण्यात आले होते. जे लोक भाजपमध्ये जातात त्यांना क्लिनचीट दिली जाते. ते धुतल्या तांदळासारखे होतात, असं बीआरएसने म्हटलं आहे. या पोस्टरवरील सर्वच नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते. त्यांची तक्रारही झाली होती. पण त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांच्या मागचा चौकशीचा सिसेमिरा थांबला. तर सिंधिया यांनी मध्यप्रदेशातील पूर्ण बहुमत असलेलं कमलनाथ यांचं सरकार पाडलं होतं. त्यांनी 25 आमदार फोडले होते. सध्या सिंधिया हे केंद्रात नागरी उड्डाण मंत्री आहेत.

के कविता यांची 9 तास चौकशी

दिल्लीतील अबकारी नीती घोटाळ्याप्रकरणी ईडीने के कविता यांची शनिवारी 9 तास चौकशी केली. त्यांना 16 मार्च रोजी पुन्हा एकदा चौकशीला येण्यास सांगितलं आहे. कविता यांनी हैदराबादमध्ये मिटिंग घेतली होती. त्यात अनेक लोक सहभागी झाले होते. या प्रकरणाशी संबंधित काही सीक्रेट व्हॉट्सअप चॅटही समोर आले होते. कविता यांना 33 टक्के शेअर मिळाले पाहिजे, असं या चॅटमध्ये म्हटल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे के कविता यांची चौकशी सुरू आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या रिमांड रिपोर्टमध्ये ईडीने कविता यांचं नाव समाविष्ट केलं होतं. दोघांची समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.