Bengal-Assam Election voting : पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये 79.79 टक्के, तर आसाममध्ये 72.14 टक्के मतदान

विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी शनिवारी (27 मार्च) पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) 79.79 टक्के, तर आसाममध्ये 72.14 टक्के मतदान झाले.

Bengal-Assam Election voting : पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये 79.79 टक्के, तर आसाममध्ये 72.14 टक्के मतदान


कोलकाता : विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी शनिवारी (27 मार्च) पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) 79.79 टक्के, तर आसाममध्ये 72.14 टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये 5 जिल्ह्यातील 30 विधानसभा मतदारसंघात हे मतदान पार पडले. काही ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या. सकाळी 7:00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत हे मतदान झालं (West Bengal Assam Election 2021 Phase-1 Voting percentage).

आसाममध्ये 126 विधानसभा मतदारसंघांपैकी पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यातील 47 जागांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. या मतदारसंघांमध्ये सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस-AIUDF मध्ये थेट सामना होणार आहे. यातील 42 जागा राज्याच्या उत्तरेकडील आहेत आणि उर्वरित 5 जागा मध्य आसामच्या नागांव जिल्ह्यातील आहेत.

पहिल्या टप्प्यात कोणत्या मोठ्या लढती?

पहिल्या टप्प्यातील मतदानात आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, विधानसभा अध्यक्ष हिरेंद्रनाथ गोस्वामी आणि आसामचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रिपुन बोरा यांचं राजकीय भविष्य पेटीबंद झालंय. मतदानाच्या दिवशीच त्यांच्या राजकीय भविष्याची घोषणा होईल. 2016 मधील निवडणुकीत यातील 35 जागांवर भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी विजय मिळवला होता. यात एकट्या भाजपने 27 जागांवर बाजी मारली होती. काँग्रेसला यातील केवळ 9 जागांवर विजय मिळवता आला होता.

आसाममध्ये 3 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. आजच्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 1 एप्रिलला (39 विधानसभा मतदारसंघ) आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान 6 एप्रिल (40 विधानसभा मतदारसंघ) रोजी होणार आहे.

हेही वाचा :

West Bengal Election 2021: बंगालच्या राजकारणात ‘ऑडिओ क्लिप वॉर’; भाजपनंतर टीएमसीकडून क्लिप जारी

ममता बॅनर्जींनी फोन करून नंदीग्राममध्ये मदत मागितली; भाजप नेत्याचा मोठा दावा

नरेंद्र मोदी, अमित शाह आले तरी एकही जागा मिळणार नाही, त्यांनी वेळ वाया घालवू नये,काँग्रेस नेत्याचा टोला

व्हिडीओ पाहा :

West Bengal Assam Election 2021 Phase-1 Voting percentage