नरेंद्र मोदी, अमित शाह आले तरी एकही जागा मिळणार नाही, त्यांनी वेळ वाया घालवू नये,काँग्रेस नेत्याचा टोला

काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह आले तरी भाजपला एकही जागा मिळणार नाही, असा दावा केला. BJP Narendra Modi and Amit Shah

नरेंद्र मोदी, अमित शाह आले तरी एकही जागा मिळणार नाही, त्यांनी वेळ वाया घालवू नये,काँग्रेस नेत्याचा टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह

तिरुअनंतपुरम: केरळमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. केरळमध्ये 6 एप्रिलला मतदान होणार आहे. केरळमध्ये सध्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट सत्तेत आहे. काँग्रेसचा यूनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट विरोधी पक्षात आहे. निवडणुकीच्या पूर्वी होत असलेल्या सर्व्हेमध्ये डाव्या पक्षांची सत्ता येण्याचा अदांज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी सर्व्हेचा अंदाज फेटाळला आहे. काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आले तरी भाजपला एकही जागा मिळणार नाही, असा दावा केला. (Congress leader Ramesh Chennithala said bjp will not won one seat after visit of Narendra Modi and Amit Shah)

आमची सत्ता येणार

रमेश चेन्नितला यांनी केरळमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा केला. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे सरकार भ्रष्टाचारानं बरबटलेलं आहे. डाव्या पक्षांच्या सरकारविरोधात लोकांमध्ये संताप आहे. आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, असा विश्वास त्यानी व्यक्त केला. केरळमध्ये भाजप यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. रमेश चेन्निथला यांनी भाजपचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शाह आले तरी त्यांना एकही जागा मिळणार नाही, असा दावा केला. भाजपला केरळमध्ये यश मिळणार नाही, त्यांनी वेळ वाया घालवू नये, असं चेन्नितला म्हणाले. आमची प्रमुख लढाई डाव्या पक्षांसोबत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

काँग्रेसकडून नव्या उमेदवारांना संधी

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं तरुण आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. याबाबत बोलताना रमेश चेन्नितला सांगतात की काँग्रेसमध्ये शांततेत क्रांतीकारक बदल होत आहेत. यामुळे काँग्रेसनं 160 जागांपैकी 55 जागावंर नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा बनवला आहे. काँग्रेसनं केरळमध्ये सत्तेत आल्यास न्याय योजना लागू करण्याचं आश्वासन दिलं आहगे. केरळमध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी काँग्रेससाठी स्टार प्रचारक आहेत.

6 एप्रिल रोजी मतदान

केरळच्या 160 जागांसाठी 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. केरळमध्ये केवळ एकाच टप्प्यात मतदान होणार असून 2 मे रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे राज्यातील जनता कुणाच्या पारड्यात मतांचं दान टाकणार हे पाहावं लागणार आहे.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद, वरुण सरदेसाई यांचा कोकण दौरा रद्द

मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव, आता राहुल गांधी म्हणतात…

(Congress leader Ramesh Chennithala said BJP will not won one seat after visit of Narendra Modi and Amit Shah)