AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद, वरुण सरदेसाई यांचा कोकण दौरा रद्द

पुढचे काही दिवस राज्यात सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांचं आयोजन करु नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद, वरुण सरदेसाई यांचा कोकण दौरा रद्द
उद्धव ठाकरे आणि वरुण सरदेसाई
| Updated on: Feb 22, 2021 | 8:44 AM
Share

रत्नागिरी : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली जातीय. कोरोनाची परिस्थिती अजून गंभीर होत असून, राज्यात दुसरी लाट आली की नाही हे लवकरच समजेल परंतु तूर्तास पुढचे काही दिवस राज्यात सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांचं आयोजन करु नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनला कोकणातील सेना कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. (Varun Sardesai Cancelled His konkan Visit After Cm uddhav thackeray Appeal)

वरुण सरदेसाई यांचा कोकण दौरा रद्द

राजापूर आणि लांजा शिवसेना शाखांनी राजकीय कार्यक्रम रद्द केले आहेत. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा कोकण दौरा आयोजित केला गेला होता. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर सरदेसाई यांचा दौरा रद्द केला गेला आहे.

राजापूर आणि लांज्यातील कार्यक्रम रद्द

युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांचे राजापूर आणि लांज्यातील कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. लांजा आणि राजापूरमध्ये शिवसेनेच्या युवा कार्यकत्यांशी संवाद वरुण  देसाई संवाद साधणार होतेृ. तसंच वरुण सरदेसाई यांच्याबरोबर युवा सेनेचे काही पदाधिकारी देखील कोकण दौऱ्यावर होते. यावेळी सेनेने राजकीय मेळाव्याचं देखील आयोजन केलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर सेनेने सगळे कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्र्यांचं आवाहन काय?

राज्यातील वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी सोमवारपासून राज्यात सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलीय. तसंच कोरोना संसर्गाच्या या कठीण काळात अशा तत्सम कार्यक्रमांचं आयोजन करु नये, अशी तंबीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

संपर्काची साखळी तोडणं हाच कोरोनावरचा उपाय आहे. आपल्याला काही गोष्टी पाळाव्याच लागतील. आता एक बंधन पुन्हा आपल्याला पाळावं लागणार आहे. आपल्याला एकत्र मिळून लढायचं आहे. आपण एकत्र राहिलो नाही तर पुन्हा एकदा लॉकडाऊन अत्यंत कडक पद्धतीने करावा लागेल, ही सूचना कोरोना देतोय. लॉकडाऊन करायचा का मी पुढचे आठ दिवस पाहणार, लॉकडाऊन ज्यांना नकोय ते मास्क घालून फिरतील, हवाय ते विना मास्क फिरतील, असं मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोना आता पुन्हा डोकं वर काढतो आहे. आपण थोडं फिरायला लागलो. हे उघडा ते उघडा म्हणणारे कोरोनाची शिस्त मोडू शकत नाही. समजूतदारपणे सूचनांचं पालन करा. सगळ्यांना वाटलं कोरोना गेला. कोरोनाची लाट खाली जाते, वर जाते. पण खाली जाते त्याच वेळेस तिला थांबवायचं असतं. आता आपण समजूतदारपणाने वागून कोरोनाची साखळी तोडूयात, असं मुख्यमंत्री म्हणाले.

(Varun Sardesai Cancelled His konkan Visit After Cm uddhav thackeray Appeal)

हे ही वाचा :

राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव खाली आणा, सामनातून मोदींवर हल्लाबोल

इंदापुरात येऊन जेव्हा अझरुद्दीन म्हणतात… ‘मी पुन्हा येईन’

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.