AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंगालमध्ये पुन्हा निवडणुकीचं बिगुल वाजलं, ममता बॅनर्जी पुन्हा मैदानात? मोठी अपडेट समोर

Mamata Banerjee : पश्चिम बंगालमधील रेझीनगर आणि नंदीग्राम या मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. आता नंदीग्राममधून ममता बॅनर्जी निवडणूक लढवणार का याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

बंगालमध्ये पुन्हा निवडणुकीचं बिगुल वाजलं, ममता बॅनर्जी पुन्हा मैदानात?  मोठी अपडेट समोर
mamta-banerjee by election updateImage Credit source: Google
| Updated on: Sep 07, 2026 | 7:50 PM
Share

केंद्रीय निवडणूक आयोगाने 4 राज्यांतील 5 विधानसभा आणि एका लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. आसाममधील नागांव लोकसभा मतदारसंघासह पश्चिम बंगालमधील रेझीनगर आणि नंदीग्राम, तामिळनाडूमधील मदुरंथकम आणि धारापुरम तसेच पुद्दुचेरीतील थट्टानचावडी विधानसभा मतदारसंघाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या ठिकाणी 6 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर 9 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर केले जाणार आहेत.

पश्चिम बंगालमधील नंदीग्राम मतदारसंघ हा मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला मानला जातो. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सुवेंदू अधिकारी यांच्या हातून पराभव स्वीकारावा लागला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूर आणि नंदीग्राम अशा दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली आणि दोन्ही ठिकाणी विजय मिळवला. भवानीपूरमध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसलाही मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता.

ममता बॅनर्जी पुन्हा मैदानात उतरणार?

मोठा विजय मिळवल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी आपला पारंपरिक नंदीग्राम मतदारसंघ सोडला. त्यामुळे आता ममता बॅनर्जी पुन्हा नंदीग्राममधून निवडणूक लढवणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्या पुन्हा मैदानात उतरून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागांव लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक

पोटनिवडणूक जाहीर झालेल्या सहा जागांपैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. आसाममधील नागांव लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रद्युत बोरदोलोई यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नागांव लोकसभा मतदारसंघातही आता पोटनिवडणूक होणार आहे.

रेझीनगरमध्येही पोटनिवडणूक

पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पश्चिम बंगालमधील रेझीनगर आणि नंदीग्राम या दोन जागांचा समावेश आहे. रेझीनगरमधून आम जनता उन्नयन पार्टी (AJUP) चे प्रमुख हुमायूं कबीर विजयी झाले होते. त्यांना नौदा मतदारसंघातूनही विजय मिळाला होता. त्यानंतर त्यांनी रेझीनगर विधानसभा मतदारसंघाचा राजीनामा दिला. त्यामुळे या जागेवरही पोटनिवडणूक होत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी हुमायूं कबीर यांची तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती.

दरम्यान, तामिळनाडूमधील मदुरंथकम आणि धारापुरम या दोन विधानसभा मतदारसंघांमध्येही पोटनिवडणूक होणार आहे. याशिवाय पुद्दुचेरीतील थट्टानचावडी विधानसभा मतदारसंघासाठीही निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात