West Bengal Election 2021 : ममता बॅनर्जी म्हणाल्या, माझं गोत्र ‘शांडिल्य’, असदुद्दीन ओवेसी भडकले!

| Updated on: Mar 31, 2021 | 3:23 PM

AIMIM चे नेते आणि खासदार असदुद्दीने ओवेसी यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार हल्ला चढवला आहे. मी शांडिल्यही नाही आणि जानवंही घालत नाही, मग मी काय करु? असा सवाल ओवेसी यांनी ममता बॅनर्जींना विचारलाय.

West Bengal Election 2021 : ममता बॅनर्जी म्हणाल्या, माझं गोत्र शांडिल्य, असदुद्दीन ओवेसी भडकले!
Follow us on

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जींनी भाजपला रोखण्यासाठी हिंदू कार्ड बाहेर काढलं आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ममता बॅनर्जी यांनी आपलं गोत्र शांडिल्य असल्याचं सांगितलं. त्यावर AIMIM चे नेते आणि खासदार असदुद्दीने ओवेसी यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार हल्ला चढवला आहे. मी शांडिल्यही नाही आणि जानवंही घालत नाही, मग मी काय करु? असा सवाल ओवेसी यांनी ममता बॅनर्जींना विचारलाय.(Asaduddin Owaisi criticizes West Bengal CM Mamata Banerjee)

“अशा लोकांनी काय करावं, जे शांडिल्य नाहीत किंवा जानवंही घालत नाहीत. जो कुण्या ठराविक देवाचा भक्त नाही. ना चालीसाचं पठण करतो. प्रत्येक पत्र जिंकण्यासाठी हिंदू कार्ड खेळतो आहे. हे अनैतिक, अपमानकारक आहे. तसंच या प्रयत्न यशस्वी होणार नाही”, असं ट्वीट करत ओवेसी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे.

ममता बॅनर्जी काय म्हणाल्या होत्या?

प्रचारच्या दुसऱ्या टप्प्यात नंदीग्राम या स्वत:च्या विधानसभा मतदारसंघात बोलताना ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा हिंदू कार्ड बाहेर काढलं. “मी मंदिरात गेले होते. तेव्हा पुजाऱ्यांनी विचारलं की तुमचं गोत्र काय? मला आठवलं की त्रिपुरेश्वरी मंदिरात मी माझं गोत्र मां, माटी, मानुष सांगितलं होतं. पण आज जेव्हा मला विचारण्यात आलं तेव्हा मी सांगितलं की माझं गोत्र शांडिल्य आहे. पण मी मानते की माझं गोत्र मां, माटी, मानुष आहे”.

गिरिराज सिंहांचाही ममतांवर निशाणा

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनीही ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केलीय. रोहिंग्यांना मतांसाठी वसवणारे, दुर्गा/काली पूजा रोखणारे, हिंदूना अपमानित करणारे, आता पराभवाच्या भीतीने गोत्र सांगत सुटले आहेत. शांडिल्य गोत्र सनातन आणि राष्ट्रासाठी समर्पित आहे, मतांसाठी नाही, अशा शब्दात गिरिराज यांनी ममतांवर निशाणा साधलाय.

संबंधित बातम्या :

West Bengal Elections 2021 : माजी क्रिकेटपटू आणि भाजप उमेदवार अशोक डिंडावर दगडफेक, गाडी फोडली

West Bengal Election 2021 : पंतप्रधान मोदींकडून आचारसंहितेचा भंग, TMCची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Asaduddin Owaisi criticizes West Bengal CM Mamata Banerjee