West Bengal Elections 2021 : माजी क्रिकेटपटू आणि भाजप उमेदवार अशोक डिंडावर दगडफेक, गाडी फोडली

भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि नुकताच भाजपमध्ये प्रवेश करुन उमेदवारी मिळवलेले अशोक दिंडा यांच्यावर हल्ला झाला आहे. अशोक दिंडा यांचा रोड शो सुरु होता.

West Bengal Elections 2021 : माजी क्रिकेटपटू आणि भाजप उमेदवार अशोक डिंडावर दगडफेक, गाडी फोडली
पश्चिम बंगालच्या मोयना विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार अशोक दिंडा यांच्यावर हल्ला

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील रणधुमाळी सुरु आहे. अशावेळी हिंसाचाराच्या मोठ्या घटना सातत्याने घडत आहेत. यात राजकीय नेते आणि उमेदवारांवरील हल्ल्यांचाही समावेश आहे. आता भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि नुकताच भाजपमध्ये प्रवेश करुन उमेदवारी मिळवलेले अशोक दिंडा यांच्यावर हल्ला झाला आहे. अशोक दिंडा यांचा रोड शो सुरु होता. त्यावेळी हा हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे. (Attack on BJP candidate Ashok Dinda, Dinda accuses Trinamool Congress)

अशोक दिंडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मोयना विधानसभा मतदारसंघातून त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. मंगळवारी या परिसरात प्रचार करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला आहे. दिंडा यांनी स्वत: ट्वीट करुन या हल्ल्याची माहिती दिली आहे. तसंच हा हल्ला तृणमूल काँग्रेनं घडवून आणल्याचा आरोपही दिंडा यांनी केलाय.

अशोक दिंडा यांची ट्विटरवरुन माहिती

‘तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझ्या ताफ्यावर हल्ला केला. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मोयनामधील BDO जवळ मला घेरलं आणि हल्ला केला. हा हल्ला दुपारी 4 वाजता झाला’, असं ट्वीट दिंडा यांनी केलं आहे.

दुसऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 27 मार्च रोजी पार पडला आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचलाय. भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनीही प्रचारात जोर लावल्याचं पाहायला मिळत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 1 एप्रिलला होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण 8 टप्प्यात मतदान होणार आहे. तर 2 मे रोजी निकाल लागेल.

संबंधित बातम्या :

West Bengal Election 2021 : पंतप्रधान मोदींकडून आचारसंहितेचा भंग, TMCची निवडणूक आयोगाकडे तक्रार

VIDEO: ममता बॅनर्जींनी सांगितलं तरी प्रचार करणार नाही; तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँचा पारा चढला

Attack on BJP candidate Ashok Dinda, Dinda accuses Trinamool Congress

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI