VIDEO: ममता बॅनर्जींनी सांगितलं तरी प्रचार करणार नाही; तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँचा पारा चढला

नुसरत जहाँ पश्चिम बंगालमध्ये रोड शो करतानाचा हा व्हीडिओ आहे. | Nusrat Jahan

VIDEO: ममता बॅनर्जींनी सांगितलं तरी प्रचार करणार नाही; तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँचा पारा चढला
ममता बॅनर्जी यांच्यासाठीही मी एका तासापेक्षा जास्त प्रचार करणार नाही.
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 1:09 PM

कोलकाता: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत (West Bengal Election 2021) तृणमुल काँग्रेसचे अनेक नेते ममता बॅनर्जी यांची साथ सोडून भाजपमध्ये गेले. अशा परिस्थितीत आता पक्षातील उरलेले नेतेही ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांची फारशी साथ देतील की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर तृणमुलच्या खासदार नुसरत जहाँ यांचा एक व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. (TMC MP nusrat Jahan roadshow in West Bengal election 2021)

या व्हीडिओत नुसरत जहाँ यांचा पारा चांगलाच चढलेला दिसत आहे. नुसरत जहाँ पश्चिम बंगालमध्ये रोड शो करतानाचा हा व्हीडिओ आहे. यावेळी तृणमुलचे काही नेते त्यांना आणखी काही काळ प्रचार करण्यासाठी गळ घालताना दिसत आहेत. मात्र, नुसरत जहाँ यांनी त्यांची मागणी सरळ धुडकावून लावली.

गेला तासभर मी प्रचार करत आहे. ममता बॅनर्जी यांच्यासाठीही मी एका तासापेक्षा जास्त प्रचार करणार नाही, असे सांगत नुसरत जहाँ प्रचारासाठीच्या गाडीतून उतरत तरातरा निघून गेल्या. त्यांचा हाच व्हीडिओ ट्विटरवर शेअर करत बंगाल भाजपने त्यांची चांगलीच फिरकी घेतली आहे.

शरद पवार रुग्णालयात, बंगालच्या रणांगणात उतरणार नाहीत, कोणकोणते दौरे रद्द?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर 31 मार्चला पोटाची शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे शरद पवार यांचे आगामी सर्व कार्यक्रम तातडीने रद्द करण्यात आले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) हे सध्या सुरु असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रचारसभा घेणार होते. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये त्यांचे प्रचार दौरे नियोजित होते. मात्र आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याने, पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले.

शरद पवार 1 एप्रिलपासून तीन दिवस पश्चिम बंगालमध्ये प्रचार करणार होते. ममता बॅनर्जी यांच्यासाठी पश्चिम बंगालची लढाई कधी नव्हे इतकी अटीतटीची झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचासारखा खंदा नेता आणि भाजपच्या अवाढव्य प्रचारयंत्रणेचा सामना करण्यासाठी ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय स्तरावरील मोदीविरोधकांची साथ मिळण्याची गरज आहे. त्यासाठी भाजपला कात्रजचा घाट दाखवणाऱ्या शरद पवार यांच्यासारख्या नेत्याचा ममता बॅनर्जी यांना प्रचारात फायदा होण्याची शक्यता होती. मात्र, आता ऐन लढाईच्यावेळी तृणमूल काँग्रेसला शरद पवारांची रसद मिळणार नसल्याने ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान

पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या 294 जागांसाठी आठ टप्प्यात मतदान होणार आहे. केरळ, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू या राज्यासंह 2 मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. पश्चिम बंगालमधील ही लढाई ममता बॅनर्जी आणि भाजप या दोहोंच्या भविष्यातील वाटचालीच्यादृष्टीने निर्णायक ठरणार आहे.

संबंधित बातम्या:

Sharad Pawar: शरद पवार रुग्णालयात, बंगालच्या रणांगणात उतरणार नाहीत, कोणकोणते दौरे रद्द?

पोटात दुखू लागल्याने शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

शरद पवारांनी काँग्रेसचा ‘तो’ प्रस्ताव नाकारला; पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या मदतीला जाणार?

(TMC MP nusrat Jahan roadshow in West Bengal election 2021)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.