West Bengal Election 2021 : निवडणूक आयोगा विरुद्ध ममता बॅनर्जी आक्रमक, परवानगीशिवाय धरणं आंदोलन सुरु

West Bengal Election 2021 : निवडणूक आयोगा विरुद्ध ममता बॅनर्जी आक्रमक, परवानगीशिवाय धरणं आंदोलन सुरु
ममता बॅनर्जी यांचं निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन

ममता बॅनर्जी यांना आंदोलनाची परवानगी देण्यात आलेली नाही. असं असलं तरी ममता यांनी मात्र आपलं आंदोलन सुरु केलं आहे.

सागर जोशी

|

Apr 13, 2021 | 2:44 PM

कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केलीय. ममता दीदींवर 24 तास प्रचारबंदीची कारवाई करण्यात आली आहे. आयोगाच्या या कारवाईविरोधात ममता बॅनर्जी यांनीही आक्रमक भूमिका घेतलीय. ममता बॅनर्जी यांनी मेयो रोडवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणं आंदोलन सुरु केलंय. दरम्यान, ममता बॅनर्जी यांना आंदोलनाची परवानगी देण्यात आलेली नाही. असं असलं तरी ममता यांनी मात्र आपलं आंदोलन सुरु केलं आहे. (Mamata banerjee protest again election commission action)

तृणमूल काँग्रेसने सकाळी पत्र लिहून धरणे आंदोलनासाठी रितसर परवानगी मागितली होती. मात्र, एवढ्या कमी वेळात आंदोलनाला परवानगी देता येणार नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. मात्र, ममता बॅनर्जी यांनी सकाळी 11.30 पासूनच धरणे आंदोलन सुरु केलं आहे.

तृणमूल काँग्रेसची निवडणूक आयोगावर टीका

निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या कारवाईविरोधात तृणमूल काँग्रेसचे नेते सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. भाजपसाठी निवडणूक आयोग धृतराष्ट्र बनले असल्याची घणाघाती टीका तृणमूल काँग्रेसचे नेते करत आहेत. निवडणूक आयोगाने केलेली कारवाई ही लोकशाहीला काळिमा फासणारी आणि असंविधानिक आहे. निवडणूक आयोग पक्षपाती बनलं आहे. भाजप नेत्यांवर त्यांच्याकडून कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी केलाय.

ममता बॅनर्जींवर 24 तास प्रचारबंदीची कारवाई

निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना 24 तासांसाठी प्रचारबंदी केली आहे. पुढील 24 तास ममता बॅनर्जी निवडणुकीत प्रचार करु शकणार नाहीत. 12 एप्रिल रात्री 8 पासून ते 13 एप्रिल रात्री 8 पर्यंत ममता बॅनर्जी यांना कोणत्याही प्रकारे निवडणूक प्रचारात सहभागी होता येणार नाही.

निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन करत ममता बॅनर्जी यांनी केलेल्या एका वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ही कारवाई केलीय. तसंच निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांनी केलेल्या वक्तव्याची तीव्र शब्दात निंदा केली आहे. निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात ममता बॅनर्जी यांच्या काही वक्तव्याचा उल्लेख करण्यात आलाय. त्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर प्रचारबंदीची कारवाई करण्यात आल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलंय.

’12 एप्रिल लोकशाहीसाठी काळा दिवस’

निवडणूक आयोगाचा हा निर्णय चुकीचा असल्याचं तृणमूल काँग्रेसनं म्हटलंय. तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी 12 एप्रिल हा लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचं म्हटलंय.

संबंधित बातम्या :

West Bengal Election 2021 : ममता बॅनर्जींवर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, 24 तासांसाठी प्रचारबंदी!

West Bengal Election 2021 : ममता दीदी, राग काढायचा तर माझ्यावर काढा, मला शिव्या घाला – पंतप्रधान मोदी

Mamata banerjee protest again election commission action

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें