AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mamata Banerjee: आता TMC मध्येच मोठा खेला! उभी फूट पडणार? ममता बॅनर्जी यांच्यासमोर ते मोठे आव्हान

Mamata Banerjee TMC: यशाचा जल्लोष साजरा करताना अनेक जण येतात. पण पराभवाचा वाटा कोणी उचलत नाही. पराभव हा तुम्हालाच पचवायचा असतो. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि बंगालची वाघीण म्हणून प्रसिद्ध असलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

Mamata Banerjee: आता TMC मध्येच मोठा खेला! उभी फूट पडणार? ममता बॅनर्जी यांच्यासमोर ते मोठे आव्हान
टीएमसीमध्ये फूट?Image Credit source: Agency
| Updated on: May 08, 2026 | 10:05 AM
Share

Mamata Banerjee TMC: यशाचे अनेक वाटेकरी असतात पण पराभवाचा वाटा कोणी उचलत नाही. हा मानवी स्वभाव आहे. सलग तीन वेळा मुख्यमंत्री असलेल्या आणि 1981 पासून राजकारणात मोठी भूमिका निभावणाऱ्या ममता दीदींनी आता हीच भीती सतावत आहे. ममता दीदींनी विधानसभा निवडणुकीतील पराभव काही मान्य नाही. त्यांनी पराभवाचे खापर केंद्रीय निवडणूक आयोगासह भाजपवर फोडले आहे. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी इंडिया ब्लॉकशी संपर्क केला आहे. त्याचवेळी त्यांच्यासमोर पक्ष एकसंघ ठेवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. काही वृत्तानुसार, पक्षातील काही नेते नाराज आहेत. तर भाजपही मोठी खेळी खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कदाचित पश्चिम बंगालमधून राजकीय भूकंपाची मोठी बातमी येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

दिग्गज नेत्यांच्या पराभवाने पक्ष खचला

ममता बॅनर्जी या लढवय्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष काढून त्याला मुख्य प्रवाहात आणले. तर इंडिया आघाडीतही त्यांचे खणखणीत नाणे वाजते. पण यंदा चौथ्यांदा करिष्मा करण्याचा प्रयत्न त्यांना जमला नाही. टीएमसीला विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. भाजपने येथे 200 हून अधिक जागा मिळवल्या. टीएमसीचे दिग्गज चेहेर चंद्रिमा भट्टाचार्य, शशी पांजा, अरूप बिस्वास, सुजीत बोस आणि ब्रात्य बसू ही दिग्गज मंडळी प्रवाहबाहेर फेकल्या गेली. त्यांना मतदारसंघ वाचवता आला नाही. निकाल आल्यानंतर ममता दीदींनी बुधवारी सर्व आमदारांची त्यांच्या कोलकत्त्यातील घरी बैठक बोलावली होती. पण त्यांच्या जवळचे 10 आमदारांनी या बैठकीला दांडी मारली. त्यामागे वेगळी कारणं असली तर पक्षात सर्वच अलबेल नसल्याचे समोर आले आहे.

पक्ष एकजुटीसाठी ममता मैदानात

एका ज्येष्ठ टीएमसी नेत्याने दावा केला आहे की ममता बॅनर्जी यांच्या बैठकीला काही आमदारांनी दांडी मारली. कारण त्यांच्या मतदारसंघात निकालानंतर हिंसाचार उसळला होता. त्यांनी स्थानिक पातळीवरच थांबण्याचे ठरवले. तर काहींनी वैयक्तिक कारणं देत उपस्थिती लावली नाही. टीएमसी पक्ष एकजुटतेसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना पराभवानंतर काय काय होऊ शकते याचा अंदाज आल्याचे मत या नेत्याने व्यक्त केले आहे. त्यामुळे काही राजकीय शक्ती टीएमसी फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

कुचबिहार, फरक्कामध्ये TMC मध्ये वाद

कुचबिहार येथील पक्षाचे वरिष्ठ नेते रवींद्रनाथ घोष यांनी त्यांच्या पराभवासाठी पक्षाचे दुसरे नेते उदयन गुहा यांच्यावर आरोप केला आहे. त्यांनी पक्षासाठी नाही तर भाजपसाठी काम केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उदयन गुहा यांची तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली.

तर दुसरीकडे फरक्का येथील माजी आमदार मोनिरुल इस्लाम यांना तिकीट नाकारण्यात आले. तेही नाराज आहेत. आमचा आपमान करण्यात आला. त्याची फळ आता पक्षाला भोगावी लागत असल्याचा दावा इस्लाम यांनी केला. तर काही इतर नेतेही उघडपणे पक्षाविरोधात बोलत असल्याने टीएमसीमध्ये कोण खेला करणार याची चर्चा होत आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?