AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कार्यकर्ते भिडले, एकाचा मूडदा…बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीचा धसका? ममता दीदींनी अखेर तो डाव टाकलाच…

President Rule in West Bengal: पश्चिम बंगालमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवल्यानंतर मोठा राडा सुरू आहे. टीएमसी आणि भाजपचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी भिडले आहेत. तर भाजपचे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले सुवेंदु अधिकारी यांच्या पीएची हत्या झाली आहे. बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागणार?

कार्यकर्ते भिडले, एकाचा मूडदा...बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीचा धसका? ममता दीदींनी अखेर तो डाव टाकलाच...
ममता बॅनर्जी टीएमसी राष्ट्रपती राजवटImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 07, 2026 | 9:24 AM
Share

President Rule in West Bengal: पश्चिम बंगालमधील निवडणुकीतील पराभव मान्य नसल्याचे ममता दीदींनी ठणकावून सांगितले. भवानीपूर मतदारसंघातील पराभव आणि राज्यात भाजपची एकहाती सत्तेविरोधात दीदींनी एल्गार पुकारला आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास त्यांनी नकार दिला. आज त्यांच्या सरकारचा अखेरचा दिवस आहे. त्यांच्या भूमिकेने घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झालेला असतानाच ममता दीदींनी सुप्रीम कोर्टात जाण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर केंद्रीय गृहमंत्री हे पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असतील. एक दोन दिवसात भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होणार असल्याचे कळते.

निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर भाजपला मदत केल्याचा गंभीर आरोप केला आहे. ममता बॅनर्जी यांचा संताप समोर आला आहे. भाजपने आयोगाच्या मदतीने निवडणुकीत मोठी गडबड केल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या तीन विधानसभा निवडणुकीपासून भाजप बंगालवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी निवडणूक आयोगाच्या मदतीने त्यांनी अनेक जागांवर उमेदवार निवडून आणल्याचा आरोप बॅनर्जी यांनी पक्षाच्या बैठकीत केला. तर याविरोधात सुप्रीम कोर्टात ममता दीदी दाद मागणार आहेत.

स्वतःच करणार सुप्रीम कोर्टात युक्तीवाद

मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य आणि इतर सहकारी आणि स्वतः ममता बॅनर्जी या सुप्रीम कोर्टात निवडणूक याचिका दाखल करतील. या याचिकांवर त्याच युक्तीवाद करतील. त्याच वकिली करणार आहेत. इंडिया आघाडीची एकजुटता कायम राहिल. त्यासाठी बॅनर्जी आघाडीतील सर्व पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. निकाल आल्यानंतर मंगळवारी ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देण्याचा पवित्रा घेतला. हा जनादेश, लोकादेश नाही, तर भाजपने गडबड करून निवडणुकीत विजय मिळवल्याचा आरोप दीदींनी केला.

कोणीही विधानसभा मतदारसंघ सोडू नका

टीएमसीचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी यांनी या निवडणुकीसाठी मोठी मेहनत घेतल्याचे सांगितले. प्रत्येक उमेदवाराने मग तो विजयी असो वा पराभूत त्यांनी मतदारसंघ न सोडण्याचे आदेश पक्षाने त्यांना दिले आहेत. टीएमसी मोठा विरोध करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय अराजकता वाढण्याची शक्यता आहे. केंद्राची इच्छा असेल तर राष्ट्रपती राजवट लागू करावी असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे.

Follow Us
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच