West Bengal Election Results: ‘ममता’गड ढासळला का? 5 टक्क्यांचे ते ओपन सीक्रेट…ज्यामुळे फिरले पारडे, भाजपच्या विजयाचे गणित समजून घ्या
West Bengal Assembly Election Results 2026: पश्चिम बंगालचा गड जिंकण्याचे स्वप्न अखेर भाजपने पूर्ण केलेच. पण हा निवडणुकीतील काही आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे. ज्यामुळे हा निकाल सूकर झाला आहे. भाजपच्या विजयाचे ते गणित समजून घ्या...

West Bengal Assembly Election Results 2026: भाजपने चौथ्या चढाईत अखेर पश्चिम बंगालचा गड काबीज केला. गेल्या तीन निवडणुकीत ममता बॅनर्जी चकमा देण्यात यशस्वी ठरल्या. यावेळेसही त्यांनी काँटे की टक्कर दिली. पश्चिम बंगाल विधानसभेच्या 206 जागा जिंकून 2/3 हून अधिक बहुमत त्यांनी मिळवले. भाजपने इतिहास रचला आणि ममता दीदीचे 15 वर्षांची सत्ता उलथवली. या विधानसभा निवडणुकीत भाजपला 45.85 टक्के मतं मिळाली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसला 40.80 टक्के मतं मिळाली. तर भाजपला टीएमसीच्या तुलनेत केवळ 5 टक्के अधिक मते मिळाली. पण जागांची आकडेवारी पाहिल्यावर ओपन सीक्रेट समोर येते. दोनही पक्षांतील जागांच्या बाबतीत फरक अडीच पटींचा आहे. इथेच सर्व गणित फिरले आहे.
भाजपचा चढता आलेख
निवडणूक आयोगाच्या आकेडवारीनुसार, भाजपने राज्यात 206 जागा जिंकल्या. तृणमूल काँग्रेसने 78 जागा मिळवल्या. तीन जागांवर टीएमसी आघाडीवर असल्याचे समजते. वर्ष 2011 मध्ये जवळपास 4 टक्क्यांच्या अत्यंत कमी मतांचा टक्का असणारी भाजप 2019 मध्ये जवळपास 40 टक्क्यांवर पोहचली. त्यानंतर 2021 मध्ये विधानसभा निवडणुकीत 77 जागा मिळवत भाजपचा झंझावात आला. भाजपने डावे पक्ष आणि काँग्रेसला मोठा धक्का दिला. टीएमसीविरोधात भाजप अशी लढत पक्की झाली. तर आताच्या निवडणुकीत टीएमसीला हरवत भाजपने सत्ता काबीज केली.
इथं गेम फिरला
पश्चिम बंगालच्या विधानसभेत 294 सदस्य आहेत. बहुमतासाठी इथं 148 मतांची गरज आहे. फाल्टा येथील मतदान रद्द झाल्याने 293 जागांवरील मतदान प्रक्रिया पार पडली. त्यामुळे बहुमताचा आकडा 147 इतका झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने सत्तारूढ तृणमूल काँग्रेसच्या पारंपारिक गडाला सुरूंग लावला. शहरी आणि ग्रामीण भागात भाजपने नियोजनबद्ध पद्धतीने लाोकांचा पाठिंबा मिळवला. या विजयासह भाजप पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा सत्तेत आले.
ममता बॅनर्जी यांनी 15 वर्षांची सत्ताच गमावली असे नाही. तर त्यांचा हुकमी एक्का भवनीपूर मतदारसंघही त्यांना गमवावा लागला. भाजपचे शुभेंदु अधिकारी यांनी ममता दीदींचा 15,000 हून अधिक मतांच्या अंतराने हरवले. भवानीपूर येथील पराभवाने मतदारांना नंदीग्राम विधानसभेत गेल्यावेळी ममता बॅनर्जी यांच्या पराभवाची आठवण करून दिली. यंदा तर त्यांचा मतदारसंघ तर गेलाच, पण राज्यातही त्यांच्या पक्षाचा दारूण पराभव झाला.