AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिफायनरीला भीषण आग, 35 कर्मचारी होरपळले, अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी

west bengal fire : पश्चिम बंगालच्या एका रिफायनरीला भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत ३५ कर्मचारी होरपळले.

रिफायनरीला भीषण आग, 35 कर्मचारी होरपळले, अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी
| Updated on: Jun 30, 2026 | 10:58 AM
Share

पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दियामध्ये मंगळवारी मोठी दुर्घटना घडली आहे. हल्दिया पेट्रोकेमिकल्स लिमिटेडच्या पाइपलाइनमध्ये भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. रिफायनरीला लागलेल्या आगीत कमीत कमी ३५ कर्मचारी होरपळल्याचे सांगण्यात येत आहे. तर अनेक जणांची प्रकृती नाजूक असल्याचे बोलले जात आहे. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील ही घटना सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. रिफायनरीतील केमिकलच्या पाइपमधून अचानक आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या. केमिकल ज्वलनशील असल्याने काही क्षणात आग सर्वत्र पसरली. या आगीत अनेक कर्मचारी होरपळले गेले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. काही अग्निशमन दलाला माहिती दिली.

https://x.com/ANI/status/2071818359575097657

35 जण जखमी

जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 35 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने हल्दियातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर काही कर्मचाऱ्यांना तामलुक मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

हल्दिया आणि पांसकुंडाला जोडणाऱ्या रेल्वे ट्रॅकजवळ ही दुर्घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर या मार्गावरील रेल्वे सेवा थांबवण्यात आली आहे. सुरुवातीला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आल्या होत्या. मात्र, आग वाढू लागल्याने आणखी गाड्या बोलवण्यात आल्या. आतापर्यंत एकूण 12 गाड्या घटनास्थळी आहेत. प्राथमिक माहितीनुसार, पाइपलाइनमधून केमिकलची गळती होत असल्याने आगीची दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. कंपनीच्या प्रशासनाने निवेदनात म्हटलं की, पाइपलाइनच्या चोरी होणार्‍या पॉइंटजवळ ही आग लागली. ही पाइपलाइन ‘नॅप्था’ची असून लोकांना घटनास्थळापासून दूर उभे राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रशासन आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुर्घटनेचा तपासाला सुरुवात केली आहे. त्यांच्या तपासानंतर रिफायनरीला आग लागण्याचे खरं कारण समोर येणार आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा