AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचे रेल्वेचे तिकीट कन्फर्म होण्याची किती शक्यता असते ? बुक करताच कळू शकते ? ही सोपी पद्धत वापरा

Waiting Ticket - वेटिंग तिकीट मिळाल्यानंतर चार्ट तयार होईपर्यंत प्रवाशांना त्यांचे तिकीट कन्फर्म झाले की नाही हे कळत नाही. जर आधीच कळले की तिकीट कोणत्या क्रमांकापर्यंत कन्फर्म होईल तर प्रवाशांचा खूप फायदा होईल.

तुमचे रेल्वेचे तिकीट कन्फर्म होण्याची किती शक्यता असते ? बुक करताच कळू शकते ? ही सोपी पद्धत वापरा
| Updated on: Jun 16, 2025 | 6:30 PM
Share

रेल्वे प्रवास सर्वात स्वस्त आणि आरामदायी असतो.त्यामुळे लांबपल्ल्याचा प्रवास शक्यतो रेल्वेने केला जातो. परंतू रेल्वेची तिकीट कन्फर्म नसली तर प्रवाशांची द्विधा अवस्था होते. रेल्वेचे तिकीट कन्फर्म होईल की नाही याची काहीही शाश्वती नसल्याने आता प्रवासाची तयारी करायची की नाही या टेन्शनमध्ये प्रवासी असतात. चार्ट चार तासांपूर्वी तयार होतो. काही लोकांचे घर टर्मिनसपासून लांब असते. त्यामुळे त्यांना घरातून लवकर निघायचे असते. त्यामुळे यातून वाचण्यासाठी तुम्ही तिकीट बुक होताच समजू शकता की तिकीट कन्फर्म होणार की नाही ते…कसे ते जाणून घ्या….

रेल्वेच्या तिकीटांची प्रतिक्षा यादी 200 ते 300 पर्यंत लांबली जाते. सणासुदीत आणि सुटीच्या हंगामात ट्रेनच्या तिकीटांना प्रचंड मागणी असते. अशा वेळी वेटिंग 500 पर्यंत पोहचते. अशा वेळी वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता कमी असते. कारण प्रवासी 60 दिवसांपूर्वी तिकीट बुकींग करत असतात. खूपच अपवादात्मक वेळेस प्रवासी तिकीट रद्द करतात. परंतू सामान्य दिवसात सुमारे 26 टक्के वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता असते.

या प्रकारे वेटिंग होते कन्फर्म

कन्फर्म तिकीट मिळाल्यानंतर सुमारे 21 प्रवासी प्रवास करीत नाही.असे प्रवासी कन्फर्म तिकीट रद्द करतात. तसेच चार्ट बनल्यानंतर सुमारे 5 टक्के प्रवासी प्रवास रद्द करतात. त्यांची आसने रिकामी राहातात. त्यामुळे या प्रकारे सामान्य रुपात एकूण वेटिंग तिकीटांपैकी 26 टक्के प्रवासी प्रवास करीत नाहीत.त्यांच्या बदल्यात वेटिंग तिकीट कर्न्फम होण्याची शक्यता 26 टक्के असते.

या प्रकारे जाणून घ्या कर्न्फम तिकीटाचे भविष्य

तुमचा वेटिंग क्रमांक पाहून या प्रकारचे कॅल्क्युलेशन करु शकता. एक स्लीपर वा थर्ड एसी कोचमध्ये 72 आसने असतात. प्रति कोच सरासरी वेटिंग नंबर 17 ते 18 आसने कन्फर्म होण्याची जादा खात्री असते. म्हणजेच सामान्य दिवसात 17 ते 18 तिकीटांची कर्न्फम होण्याची शक्यता असते.या प्रवाशांची तिकीट कन्फर्म होऊन आरएसी किंवा पूर्ण बर्थ मिळू शकते.

संपूर्ण ट्रेनचा सरासरी आकडा असा काढा

उदाहरणार्थ सर्वसामान्य लांबपल्ल्या गाड्यांना 22 ते 24 कोच असतात. इंजिन आणि गार्डच्या कोच शिवाय 4 कोच जनरल असतात. तसेच 8 कोच स्लीपर असतात. अशा प्रकारे या कोचमध्ये 75 ते 80 वेटिंगपर्यंत तिकीट कन्फर्म होते. आता ट्रेन सुटण्यापूर्वी चार तास आधी चार्ट तयार होतो. परंतू, आता ट्रेन सुटण्यापूर्वी 24 तास आधी चार्ट तयार करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन घेणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.