पाकिस्तानी अधिकारी दानिशसोबत युट्यूबर ज्योती मल्होत्राचं नक्की नातं काय? या कारणाने वाढल्या भेटीगाठी
सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ते युट्यूबर ज्योती मल्होत्राची. तिचे.पाकिस्तानी अधिकाऱ्याशी संबंध असून ती भारताविरोधात गुप्तहेर म्हणून काम करत होती या संशयावरून तिला हरियाणाच्या हिसार येथून अटक करण्यात आली. पण खरंच तिचे आणि .पाकिस्तानी अधिकारी दानिश यांच्यात काय नातं आहे?

सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ते युट्यूबर ज्योती मल्होत्राची. तिला हरियाणाच्या हिसार येथून अटक करण्यात आली. तिच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याचा आरोप होता. ऑपरेशन सिंदूर नंतर, हेरगिरीच्या आरोपाखाली एक-एक करून 6 जणांना पकडण्यात आले. सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या तपासादरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. ज्यामध्ये ज्योतीची पाकिस्तानी अधिकारी दानिशसोबतची ओळख समोर आली. तसेच, तिच्यावर दानिशशी संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, ज्योती दानिशला कधी भेटली आणि त्यांच्यात काय संबंध आहे? हे जाणून घेऊयात.
“दानिश खूपच मैत्रीपूर्ण वाटला…”
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांना दिलेल्या जबाबात ज्योती मल्होत्राने सांगितले की, तिने ‘ट्रॅव्हल विथ जो’ या नावाने एक यूट्यूब अकाउंट तयार केले होते. तिला पाकिस्तान एक्सप्लोर करायचं होतं. म्हणून, 2023 मध्ये, ती व्हिसा मिळवण्यासाठी नवी दिल्लीतील पाकिस्तान एंबेसीत गेली होती. ज्योतीने पोलिसांना सांगितले की, तिची भेट पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी अहसान-उर-रहीम उर्फ दानिशशी झाली. पहिल्या भेटीत दानिश खूपच मैत्रीपूर्ण वाटला. तिने व्हिसा अपडेटसाठी दानिशचा नंबर घेतला. तिथून परतल्यानंतर ती व्हिसाच्या बहाण्याने दानिशशी फोनवर बोलू लागली.
दानिशने ज्योतीला पाकिस्तानात या व्यक्तिला भेटण्यास सांगितले
2023 मध्ये ज्योती मल्होत्राला पाकिस्तानचा 10 दिवसांचा व्हिसा मिळाला. दानिशने तिला पाकिस्तानात अली आहवानला भेटण्यास सांगितले. अली आहवानने तिच्या प्रवासाची आणि राहण्याची व्यवस्था केली.तसेच त्याने तिची ओळख पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांशीही करून दिली. असे म्हटले जाते की ती दानिशला अनेक वेळा भेटली. ज्योती या वर्षी 23 मार्च रोजी पाकिस्तानी दूतावासात गेली होती. जिथे ती इफ्तार पार्टीतही सहभागी झाली होती. ज्याचा व्हिडिओ तिने तिच्या चॅनेलवर अपलोडही केला. जेव्हा ती दूतावासात पोहोचली तेव्हा दानिशने तिचे अतिशय मैत्रीपूर्ण पद्धतीने स्वागत केले आणि दोघेही एकमेकांशी अशा प्रकारे बोलत असल्याचे दिसून आले जणू ते एकमेकांना खूप जवळून ओळखत आहेत. दानिशने तिची त्याच्या पत्नीशी देखील ओळख करून दिली.
हिसार पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान ज्योतीने काय कबूल केले?
हिसार पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान ज्योतीने कबूल केले की ती दोनदा पाकिस्तानला गेली होती आणि काश्मीरलाही भेट दिली होती. तिने एका गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यासोबत इंडोनेशियातील बाली येथेही भेट दिली. ती नेपाळलाही गेली. तिने इंडोनेशिया आणि चीनसह अनेक देशांचा प्रवास केला आहे.
