AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

What India Thinks Today : जागतिक शांततेसाठी भारताची भूमिका काय असणार ? तज्ज्ञांचे विचारमंथन

TV9 नेटवर्कच्या वार्षिक कॉन्क्लेव्ह व्हॉट इंडिया थिंक टुडे या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील महत्वाच्या व्यक्ती आपले विचार मांडणार आहेत. या वार्षिक परिषदेचे दुसरे पर्व रविवारी 25 फेब्रुवारीला दिल्लीच्या अशोक हॉटेल येथे सुरु होणार आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी जागतिक शांततेत भारताची भूमिका काय ? या विषयावर चर्चा होणार आहे.

What India Thinks Today : जागतिक शांततेसाठी भारताची भूमिका काय असणार ? तज्ज्ञांचे विचारमंथन
What India Thinks Today Global Summit 2024: What will be India's role for world peace? Expert brainstorming
| Updated on: Feb 22, 2024 | 8:30 PM
Share

नवी दिल्ली | 22 फेब्रुवारी 2024 : नंबर वन न्यूज नेटवर्क TV9 पुन्हा एकदा व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ( What India Thinks Today) ग्लोबल समीट 2024 च्या दुसऱ्या सिझनची सुरुवात करणार आहे. या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देश-विदेशातील नामवंत मंडळी उपस्थित राहून आपले विचार मांडणार आहेत. या शिखर परिषदेची सुरुवात येत्या रविवार 25 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या अशोक हॉटेल येथे होणार आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी जागतिक शांततेत भारताची भूमिका काय ? या विषयावर चर्चासत्रात अनेक मंडळी आपले विचार मांडणार आहेत.

व्हॉट इंडीया थिंक्स टुडे ग्लोबल समीटच्या दुसऱ्या दिवशी 26 फेब्रुवारीला नॉट एन एरा ऑफ वॉर : इंडिया एज ए ग्लोबल पीस केटालिस्ट ( Not an Era of War: India as a Global Peace Catalyst ) या विषयावर चर्चासत्र होणार आहे. या महत्वाच्या चर्चा सत्रात वेलिना त्चकारोवा (Velina tchakarova), मारिया अहमद दीदी (Mariya Ahmed Didi) आणि सैयद अकबरुद्दीन (Syed Akbaruddin) सहभागी होणार आहेत.

सैयद अकबरुद्दीन : ज्येष्ठ भारतीय मुत्सद्दी

राजदूत सैयद अकबरुद्दीन एक ज्येष्ठ भारतीय मुत्सद्दी आहेत. त्यांनी वेगवेगळ्या व्यासपीठावर आणि विविध देशात भारताची भूमिका मांडली आहे. जगभरात भारताचे मैत्रीपूर्ण संबंध वाढविण्याचा अनेक दशकांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. ऑक्टोबर 2015 मध्ये आयोजित केलेल्या भारत-आफ्रीका फोरम शिखर परिषदेचे ते मुख्य समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहीले होते. याआधी त्यांनी 2012-2015 दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ता म्हणून त्यांनी काम पाहीले होते. अकबरुद्दीन यांनी युएनजीए आणि अन्य बहुपक्षीय तसेच द्विपक्षीय बैठकात भारतीय प्रतिनिधीमंडळाचे सदस्य देखील होते. त्यांनी साल 2006 ते 2011 पर्यंत व्हीएन्नात आंतरराष्ट्रीय अणू ऊर्जा एजन्सी ( IAEA ) मध्ये एक आंतरराष्ट्रीय सिव्हील सेवक म्हणून एक एक्सर्टनल रिलेशन्स एंड पॉलिसी कोऑर्डिनेशन यूनिट आणि आयएईएचे महासंचालकांचे स्पेशल असिस्टंट म्हणूनही काम केले आहे. सध्या कौटिल्य स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीमध्ये ते डीन म्हणून कार्यरत आहेत.

मारिया दीदी : मालदीवचे माजी संरक्षणमंत्री

मारिया दीदी मालदीवियन बॅरिस्टर आणि राजकीय मुत्सदी आहेत. त्या मालदीवचे संरक्षण मंत्री पद सांभाळणाऱ्या पहिल्या महिला नेत्या होत्या. मानवाधिकार कार्यकर्ता म्हणून कार्य करणाऱ्या त्या मालदीवच्या पहिल्या महिला वकील देखील आहेत. त्यांना सुरक्षा बलांना व्यावसायिक आणि आधुनिक बनविले, त्यांनी सैन्यात लैंगिक समानता वाढविण्यासाठी देखील कार्य केले. लोकशाहीला प्रोत्साहन देण्यासोबत त्यानी मानवाधिकाराच्या लढाईतही शानदार काम केले. त्यांच्या कामामुळे त्यांना अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांनी 2007 मध्ये इंटरनेशलन वूमेन ऑफ करेज अवॉर्डने गौरविले होते.

वेलिना त्चाकारोवा : संरक्षण क्षेत्रातील जागतिक चेहरा

वेलिना त्चाकारोवा (Velina Tchakarova) यांना देखील संरक्षण क्षेत्रातील चर्चित चेहरा मानला जातो. सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील 20 वर्षांचा दांडगा अनुभव त्यांना आहे. त्यांनी स्वत:ची जिओपॉलिटीकल कन्सलटींग कंपनी FACE ची स्थापना करण्यापूर्वी व्हीएन्नात ऑस्ट्रियाई इंस्टीट्यूट फॉर यूरोपियन एंड सिक्योरिटी पॉलिसी (AIES) च्या संचालिका म्हणून काम केले.त्चाकारोवा यांनी जागतिक पातळीवर जिओपॉलिटीकल मुद्द्यांसह क्षेत्रीय आणि वैश्विक पातळीवर खासा अनुभव आहे. त्या रियल-वर्ल्डज रिस्क इन्स्टीट्यूटमध्ये प्रशिक्षक म्हणून देखील काम केले आहे. तसेच ऑस्ट्रीयाई संघीय संरक्षण मंत्रालयात त्या विज्ञान आयोगाच्या रणनीती आणि सुरक्षा निती सल्लागार बोर्डाच्या सक्रीय सदस्य आहेत. भारत, रशिया आणि चीन दरम्यानचे संबंध आणि युरोपीय संघ आणि भारतादरम्यानच्या संबंधांचा विकासात त्यांना रस आहे.

या शिवाय व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समीटच्या तिसऱ्या दिवशी 27 फेब्रुवारीला ‘सत्ता सम्मेलन’ नावाच्या चर्चासत्रात अनेक राजकीय नेते सहभागी होणार आहेत. त्यात विरोधी पक्ष नेते देखील सहभाग घेणार आहेत. कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी नेते सहभागी होतील. तसेच सत्ताधारी पक्षातील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि भाजपाचे सरकार असलेल्या अनेक राज्याचे मुख्यमंत्री देखील सामील होणार आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.