What India Thinks Today : जगात भारताचं स्थान काय?; दिग्गज मांडणार भूमिका
ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज नेत्या जोडी मॅके या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समीटमध्ये सामील होणार आहेत. भारतीय प्रवाशांचं समर्थन करणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचं साडीवरील प्रेमही जगजाहीर आहे. ऑस्ट्रेलियाच्या संसदेत साडी नेसून जाणाऱ्या त्या पहिल्या आणि एकमेव महिला खासदार आहेत. त्यामुळे टीव्ही9 नेटवर्कने आयोजित केलेल्या या समीटमध्ये त्या काय बोलणार?याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नवी दिल्ली | 22 फेब्रुवारी 2024 : टीव्ही9 नेटवर्कने व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समीटचं आयोजन केलं आहे. येत्या 25 फेब्रुवारीपासून ही ग्लोबल समीट सुरू होणार आहे. या समीटमध्ये फक्त राजकारणीच नव्हे तर सिनेमा, खेळ आणि अर्थ जगतातील अनेक मान्यवर उपस्थित राहून आपली भूमिका मांडणार आहेत. तसेच भारताने कशा पतीने प्रगती केली पाहिजे याची माहितीही देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मल्लिकार्जुन खरगे आणि अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक मान्यवर या महासंमेलनात भाग घेणार आहेत.
ग्लोबल समीट व्हॉट इंडिया थिंक्स टुडेचं हे दुसरं पर्व आहे. या पर्वातील दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 फेब्रुवारी रोजी Betting on India: The Macro View या विषयावर परिसंवाद ठेवण्यात आला आहे. या परिसंवादात आपआपल्या क्षेत्रातील अनेक दिग्गज भाग घेणार असून आपला दृष्टीकोण मांडणार आहेत. Betting on India: The Macro View परिसंवादात यूएस- इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनशिप फोरमचे अध्यक्ष आणि सीईओ मुकेश अघी, डॉ. संजीव सान्याल,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य आणि ऑस्ट्रेलिया-भारत बिजनेस कौन्सिलचे संचालक आणि ऑस्ट्रेलिया सरकारचे माजी विरोधी पक्ष नेते जोडी मॅके यावेळी आपलं मनोगत मांडणार आहेत. जगभरातील लोकांचा भारतावर किती विश्वास आहे आणि भविष्यात कोणत्या क्षेत्रात भारताला यश मिळणार आहे, यावर या परिसंवादात सखोल मंथन होणार आहे.
मुकेश अघी यांच्याबाबत
डॉ. मुकेश अघी हे भारत आणि अमेरिकेतील चर्चित हस्ती आहेत. ते यूएस- इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशीप फोरमचे अध्यक्ष आणि सीईओ आहेत. अमेरिका आणि भारतामधील व्यापारी संबध आणि सरकारी संबंध मजबूत करणे आणि त्याला प्रोत्साहन देण्यावर त्यांचा अधिक भर असतो. यापूर्वी त्यांनी IBM, Ariba, Inc. आणिL&T Infotech सारख्या अनेक बड्या कंपन्यांमध्ये काम केलं आहे. त्यांना 30 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. मुकेश अघी यांनी क्लेरमोंट ग्रॅज्युएट यूनिव्हर्सिटीतून आंतरराष्ट्रीय संबंधांवर पीएचडी केली आहे. त्याचबरोबर हार्वर्ड बिजनेस स्कूलमध्ये अॅडव्हान्स मॅनेजमेंटचा डिप्लोमा आणि इंटरनॅशनल मार्केटिंगमध्ये एमबीएची डिग्रीही घेतली आहे. एक वैश्विक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. मॅरेथॉनचे ते धावपटू आहेत. गिर्यारोहक आहेत. त्यांनी या स्पर्धांमध्ये भागही घेतलेला आहे.
सान्याल यांच्याविषयी
या परिसंवादात सामील होणारे डॉ. संजीव सान्याल पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य आहेत. सान्याल एक अर्थतज्ज्ञ असून बेस्ट सेलिंग लेखक आणि पर्यावरणवादीही आहेत. यापूर्वी त्यांनी पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणून काम केले आहे. त्यांनी डॉयचे बँकमध्ये वैश्विक रणनीतीकार आणि प्रबंधक संचालक आदी भूमिका पार पाडल्या आहेत. त्यांनी आर्थिक क्षेत्रात एक दशक काम केलं आहे. त्यांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने यंग ग्लोबल लीडर 2010 पुरस्कार देऊन गौरवलं आहे. त्यांना सिंगापूर सरकारने वर्ल्ड सिटीज समीटच्या दरम्यान यंग लीडर 2014 पुरस्कार दिला आहे. ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अर्बन एजच्या स्टिअरिंग कमिटीचे सदस्य होते. त्याचबरोबर वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंडचे ज्येष्ठ फेलेहो होते.
ऑस्ट्रेलियाच्या संसदेत साडी नेसून जाणाऱ्या खासदार
या परिसंवादात जोडी मॅकेही सामील होणआर आहेत. त्यांचे ऑस्ट्रेलियाशी नाते आहे. जोडी मॅके या दोन देशातील गुंतवणूक आणि व्यावसायिक परिणाम देण्यासाठी स्थापन केलेल्या ऑस्ट्रेलिया-भारत बिझनेस काऊंसिलच्या संचालक आहेत. त्या गेल्या 15 वर्षापासून ऑस्ट्रेलियात खासदार आहेत. त्यांनी कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्षनेत्या म्हणून काम केलं आहे. त्या सेंटर फॉर ऑस्ट्रेलिया- इंडिया रिलेशन्सच्या सल्लागार बोर्डाच्या सदस्या आहेत. भारतीय प्रवाशांच्या समर्थन करणाऱ्या नेत्या म्हणूनही त्यांची वेगळी ओळख आहे. ऑस्ट्रेलियाच्या संसदेत सहावार साडी नेसून जाणाऱ्या त्या पहिल्या महिला खासदार आहेत.