उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलं नवं नाव?; काय म्हणाले ठाकरे?

सरकार आपल्या दारी असं सरकार म्हणते. शेतकऱ्याचं किती नुकसान झाले. पंचनामे झाले, मात्र मदत मिळाली का ? असा सवाल करतानाचे उद्धव ठाकरे यांनी आता याबद्दल घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि त्यांचे पाव-पाव उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनाच जाब विचारला पाहीजेत असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलं नवं नाव?; काय म्हणाले ठाकरे?
Uddhav ThackerayImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Feb 22, 2024 | 6:40 PM

गणेश सोलंकी, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, बुलढाणा | 22 फेब्रुवारी 2024 : माजी मुख्यमंत्री, शिवसेनेच्या उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाणा येथे भाजपावर जोरदार टीका केली. गद्दारांना हमीभाव आहे, परंतू माझ्या शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही. जिल्ह्यातील 550 गावात अद्यापही रोजगार हमी योजनेची कामे सुरु झालेली नाहीत. पंतप्रधानांच्या किती योजनांचा फायदा झाला असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मोदी भाजपाचे पंतप्रधान म्हणून भाषणे करीत आहेत. त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून भाषण करावे असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे.

देशात जीवाला जीव देणारी माणसे राहीली नाहीत. मी तुमच्या प्रेमाचा भुकेला आहे. तुम्हाला भेटल्यानंतर कुटुंबाला भेटल्याचा आनंद होतो. जनसंवाद होतो. त्या गद्दारांना त्यांचे 50 खोके लख लाभो. चिन्ह, पक्ष चोरला, कपाळावरचं भाग्य, शिक्का तर कोणी चोरू शकत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठणकावले. लोणार येथील अन्न विषबाधा घटनेत उपचारासाठी डॉक्टर देखील उपलब्ध  नव्हते अशी परिस्थिती आहे.

भाजपाच्या पोटात शिवसैनिक लाथा घालतील

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की हो मी कॉंग्रेस सोबत गेलो. कारण भाजपाने वचनाचा भंग केला. मी माझ्यासाठी नव्हे शिवसेनेसाठी मुख्यमंत्री द्या म्हटले होते. अडीच-अडीच वर्षे ठरले होते. शब्द तुम्ही मोडला. मी कोणालाही फसविले नाही. लुबाडले नाही. आयुष्यात कधीही खोटे बोलले नाही. मोदीजी तुम्हाला वाजपेयी कचऱ्यात टाकणार होते. मात्र बाळासाहेबांनी वाचविले असेही ठाकरे यावेळी म्हणाले. गुजरातला तु्म्ही जरुर समृद्ध करा. परंतू महाराष्ट्राला ओरबाडून करु नका, असे कराल तर भाजपाच्या पोटात शिवसैनिक लाथा घालतील अशी टीका त्यांनी यावेळी केली.

आजपासून निवडणूक आयोगाचं नाव…

ईडी, सीबीआय भाजपाचे घरगडी म्हणून काम करीत आहेत. परंतू आमचं सरकार आल्यावर आम्ही देखील पाहून घेऊ काय करायचे ते असा इशारा ठाकरे यांनी यावेळी दिला. भाजपा आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांना एकच सांगतो, की तुमची मेहनत कुठे गेली, कारण आयात केलेल्या लोकांना उमेदवारी मिळणार असल्याचे ते म्हणाले. गद्दारांची शिवसेना मानत नाही आणि आजपासून निवडणूक आयोगाचे नवे नाव धोंड्या अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सरकारी यंत्रणा आणि त्यांचा गैरवापर करणाऱ्या भाजपा सरकारवर चढविला.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.