पोलीस हवालदाराच्या मुलीचे संशोधन, आंब्याच्या कोयीपासून व्हिटामिन्स B-12 तयार केले

या संशोधनात आढळले की गुजरात येथील 27 टक्के जनतेत B-12 ची कमतरता आढळते. सुरतमध्ये सर्वात कमी 15 टक्के तर अहमदाबाद येथे सर्वाधिक 35 टक्के जनता व्हिटामिन्स B -12 च्या कमतरतेने पीडीत आहे. येथे मांसाहारी पेक्षा शाकाहारी लोकांची संख्या जास्त आहे असे पारुल युनिव्हर्सिटीच्या डेअरी एण्ड फूड टेक्नॉलॉजी विभागाचे प्रोफेसर विजय दत्ताराव केळे यांनी सांगितले. 

पोलीस हवालदाराच्या मुलीचे संशोधन, आंब्याच्या कोयीपासून व्हिटामिन्स B-12 तयार केले
mango seeds b-12Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Feb 22, 2024 | 5:25 PM

गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई | 22 फेब्रुवारी 2024 : ‘आम के आम, गुठलियों के दाम’, अशी हिंदीतील म्हण आता यंदाच्या आंब्यांच्या सिझनमध्ये खरोखरच वास्तवात उतरली आहे. कारण तसं घडले आहे. आंब्याचा गर खाऊन कोय फेकत असाल तर  त्या फेकून देत असाल तर ही बातमी वाचायला हवी. कारण ही कोय देखील आंब्या इतकीच मुल्यवान ठरणार आहे. या कोयीपासून व्हिटामिन्स B-12 हे पोषण मुल्य शोधून काढण्याचे काम एका तरुण महिला संशोधकाने केले आहे.

अल्फान्सो किंवा ज्याला आपण रत्नागिरीचा प्रसिध्द हापूस म्हणतो त्या आंब्याची कोय देखील तितकीच पौष्टीक ठरली आहे. या आंब्याच्या कोयीला ग्राईंडींग, क्रशिंग आणि फिल्टरींग केल्यानंतर त्यापासून पाश्चरायजेशन केल्यानंतर संशोधकाना आंब्यांच्या कोयीपासून विटामिन्स बी – 12 हे व्हीटामिन्स मिळाले. ज्यांना बी-12 ची कमतरता आहे. त्यांना रक्ताच्या पोषणासाठी हा खूपच उपयुक्त ठरणार आहे. विशेष करुन शाकाहारी लोकांना आंब्याच्या कोयीपासूनचे तयार केलेले हे ज्यूस खूपच फायद्याचे ठरणार आहे. एका रिसर्च पेपरमुळे आंब्याच्या कोयीमधील बी-12 व्हिटामिन्सचा शोध लागला. गुजरात येथील शाकाहारी लोकांमध्ये B-12 ची कमतरता असते. त्यामुळे गुजरात येथील वडोदरा, अहमदाबाद आणि सुरत शहरात या शहरातील B-12 विटामिन्सची कमतरतेवर अभ्यास करताना हा त्यावर उपाय म्हणून आंब्याची कोय महत्वाची ठरली.

प्रोफेसर केळे आणि त्यांची विद्यार्थीनी असलेल्या प्रियंका देसाई यांनी त्यानंतर आंब्याच्या कोयीचा अभ्यास सुरु केला.  त्यांना त्यात B-12 व्हिटामिन्स आढळले. त्यामुळे शाकाहारी लोकांमधील B-12 व्हिटामिन्सची कमतरता भरुन काढणे शक्य होईल असे म्हटले जात आहे. संशोधकांना आंब्याची कोय गरम पाण्यात 12 तास भिजविली. तिची साल काढली. क्रश करुन त्यातील सॉलिड भाग फिल्टर केला, त्यानंतर ते लिक्वीड पाश्चराईज्ड केले. त्यानंतर हे लिक्वीड 63 डीग्री सेल्सिअस तीस मिनिटे ठेवले. नंतर 4 डीग्री सेल्सिअस पर्यंत थंड करुन पेट बॉटल्समध्ये पॅक केले.

प्रयोगशाळेत तपासणी

त्यानंतर हे नमूने आणंद येथील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ( NDDB ) चे हेडक्वार्टर आणि नवीमुंबईतील ऑटोकल सोल्युशन प्रा. लि. अशा दोन NABL मान्यताप्राप्त लॅबोरेटरीमध्ये तपासणीसाठी पाठविले. त्यात 100 मिलीमीटर ज्यूसमध्ये 10 मायक्रोग्रॅम व्हिटामिन्स सापडले. हे B-12 ची कमतरता असलेल्या वयस्कांना द्यावा लागणाऱ्या 2.4 मायक्रोग्रॅम व्हिटामिन्सहून हे अधिक असल्याचे केळे यांनी सांगितले.

पोलीस हवालदाराच्या कन्येची कमाल

रक्ताचे आरोग्य राखण्यासाठी आणि रक्तप्रवाहात व्हिटॅमिन बी 12 ची पातळी सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या रकमेवर आधारित व्हिटॅमिन बी 12 साठी आहार भत्ता (RDA) निर्धारित केला जातो असे केळे यांनी सांगितले. इतकेच काय, SSIP च्या आर्थिक सहाय्याचा लाभ घेण्यासाठी गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या इनोव्हेशन अँड स्टार्टअप सेंटरमधील स्टुडंट स्टार्टअप अँड इनोव्हेशन पॉलिसी ( SSIP ) च्या तज्ञांच्या स्क्रीनिंग कमिटीने देखील या प्रकल्पाची निवड केली असल्याचे केळे यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पातील संशोधक विद्यार्थीनी मुमुंबईतील पोलीस हवालदार विलास देसाई यांची कन्या असलेली प्रियंका देसाई ( टीना ) हिने आंब्याच्या कोयीपासून बी 12 विटामिन तयार केले आणि त्याचे पेंटट मिळविले आहे. मुळची कुर्ला नेहरु नगर येथील राहणाऱ्या प्रियंका हीने वयाच्या 24 व्या वर्षी हा मान पटकावला आहे. कोयी पासूनचा ज्यूस विविध फ्लेवरमध्ये तयार होणार आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल.
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्...
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्....
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार.
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले.
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
सर्व साहेबांनी केलं, मग 32 वर्ष मी काय... अजित पवारांचा कुणावर निशाणा?
सर्व साहेबांनी केलं, मग 32 वर्ष मी काय... अजित पवारांचा कुणावर निशाणा?.
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.