
दिल्ली | 22 फेब्रुवारी 2024 : टीव्ही 9 नेटवर्कचा वार्षिक सोहळा ‘व्हॉट इंडिया थिंक्स टु़डे ग्लोबल समिट 2024′ पुन्हा नवी दिल्लीत भरत आहे. यंदाचे या परिषदेचे दुसरे वर्ष आहे. न्यूज नेटवर्क TV9 च्या या विशेष सोहळ्यात बुद्धीला चालना देणाऱ्या चर्चांसोबत भारताच्या कामगिरीवर प्रकाश झोत टाकला जाणार आहे. रविवारी 25 फेब्रुवारीला होणाऱ्या या सोहळ्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह समाज, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, अर्थव्यवस्था या क्षेत्रातील नामवंत मंडळी आपले विचार मांडून देशाच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडणार आहेत. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, क्रिकेटर सुर्यकुमार यादव यांच्यासह अनेक प्रसिद्ध आणि गुणी खेळाडू या संमेलनात सामील होणार आहेत.
एकीकाळी फर्स्ट क्लास क्रिकेटपटू असलेले आणि बीसीसीआयचे अध्यक्ष पद भूषविलेले अनुराग ठाकूर केंद्र सरकारमध्ये क्रीडा मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. देशात खेळ संस्कृती रुजावी यासाठी ते प्रयत्नरथ आहेत. क्रीडा क्षेत्रात देशाचे नाव पुढे यावे यासाठी ते कष्ट घेत आहेत. त्यांचे मंत्रालय खेलो इंडीया मोहीमेद्वारे देशातील दुर्गम भागातून नव्या प्रतिभावंत खेळाडूंचा शोध घेत त्यांना संधी देत आहे. देशाला क्रीडा क्षेत्रातही सुपर पॉवर बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘खेलो इंडीया’ ची सुरुवात केली. त्यामुळे देशातील युवकांना त्याचा फायदा होत आहे. क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर हे भारताचे क्रीडा क्षेत्रात नेमकं काय लक्ष्य आहे याविषयी या परिषदेत आपले विचार मांडणार आहेत.
भारतीय क्रिकेट टीमचा स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव यानी टी 20 क्रिकेटमध्ये आपल्या स्टायलीश आणि विस्फोटक बॅटींगने एक वेगळी ओळख तयार केली आहे. गेल्या एकवर्षांहून अधिक काळ सुर्यकुमार या फॉरमॅटमध्ये जगातील नंबर एकचा फलंदाज म्हणून कायम आहे. आणि त्याने भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुराही सांभाळली होती.
भारताची युवा एथलिट हरमिलन बैंस यांनी गेल्यावर्षी एशियन गेम्समध्ये 800 मीटरच्या शर्यतीत सिल्व्हर मेडल जिंकून नवा इतिहास रचला आहे. तसेच 1500 मीटर शर्यतीत तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
भारताचे माजी बॅडमिंटन स्टार आणि प्रसिध्द कोच पुलेला गोपीचंद यांनी अनेक बॅडमिंटन स्टार देशाला दिले आहेत. सायना नेहवाल, पीव्ही सिंधू सारखे त्यांच्या शिष्यांनी ऑलंम्पिकमध्ये मेडल मिळविली आहेत. देशासाठी नवे बॅडमिंटन स्टार घडविण्याचे त्यांचे कार्य निरंतर सुरु आहे.
जम्मू-काश्मीर पॅरा क्रिकेट टीमचे कॅप्टन आमिर हुसैन लोन यांची बॅटींगची आगळी शैली पाहून तुम्ही आश्चर्यचकीत झाल्यावाचून राहणार नाहीत. ते केवळ संघाचे नेतृत्वच करीत नाहीत तर अन्य खेळाडूंनाही प्रेरणा देत आहेत. दोन्ही हात नसल्याने मान आणि खांद्यांचा वापर करुन बॅटींग करण्याचा त्यांचा व्हीडीओ अलिकडेच खूप व्हायरल झाला होता.