AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

What India Thinks Today : ‘अग्निपथ’ला देशभरातून विरोध; ‘टीव्ही 9’ च्या ग्लोबल समिटमध्ये काय म्हणाले मोदी सरकारमधील पाच मंत्री, वाचा सविस्तर

अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. यावर मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. जाणून घेऊयात नेमकं त्यांनी काय म्हटलं?

What India Thinks Today : 'अग्निपथ'ला देशभरातून विरोध; 'टीव्ही 9' च्या ग्लोबल समिटमध्ये काय म्हणाले मोदी सरकारमधील पाच मंत्री, वाचा सविस्तर
| Updated on: Jun 19, 2022 | 1:47 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून तरुणांसाठी ‘अग्निपथ’ योजनेची घोषणा करण्यात आली आहे. मात्र सध्या या योजनेला अनेक राज्यांमधून विरोध होत आहे. तरुण रस्त्यावर उतरलेत. बिहारमध्ये अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना देखील घडल्या आहेत. केंद्र सरकारकडून तरुणांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच या योजनेचे फायदे देखील सांगण्यात येत आहेत. टीव्ही 9 च्या वतीने ग्लोबल समिटचे (What India Thinks Today) आयोजन करण्यात आले आहे. या समिटमध्ये देश विदेशातील अनेक नामवंत व्यक्ती सहभागी झाले आहेत. या समिटमध्ये संरक्षमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah), केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी, अनुराग ठाकूर, स्मृति ईरानी यांच्यासह अनेक मंत्री सहभागी झाले आहेत. समिटमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक नेत्याने अग्निपथ योजनेबाबत आपले मत व्यक्त केले आहे. पाहुयात नेमंक कोण काय काय म्हणाले?

  1. अग्निपथबाबत आपले विचार व्यक्त करताना राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजना सुरू केली आहे. ही एक ऐतिहासिक योजना असून, यामुळे सैन्य दलात क्रांती येईल. तसेच हजारो तरुणांना यामाध्यमातून रोजगार मिळेल. मात्र काही लोकांकडून या योजनेबाबत जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे. अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवांना बळी पडता कामा नये.
  2. अग्निपथबाबत बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे की, रेल्वे ही सर्वसामान्यांची जीवनवाहीनी आहे. ज्या लोकांना विमानाचा खर्च परवडत नाही, त्यांच्यासाठी रेल्वे हाच एक पर्याय असतो. त्यामुळे रेल्वेच्या संपत्तीला नुकसान पोहोचवणे योग्य नाही. येत्या काळात रेल्वे विभागाच्या संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांविरोधात अधिक कडक कायदा केला जाईल.
  3. अग्निपथ बाबत बोलताना केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे की, भारत हा लोकशाही देश आहे. इथे प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होणे गरजेचे आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये. तुम्हाला जर जाळपोळ करायचीच असेल तर ती अफवा पसरवणाऱ्यांपासून सुरू करा. कोरोनामुळे गेले दोन वर्ष भरती होऊ शकली नाही. त्यासाठीच केंद्राकडून ही योजना आणण्यात आली आहे.
  4. अग्निपथबाबत बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इरानी यांनी म्हटले आहे की, सैन्य सेवेसारखी दुसरी सेवा नाही. सैन्य सेवेला कोणीही पैशात तोलू नये. मी स्वत: जनरल बिपिन रावत यांच्यासोबत काम केले आहे. त्यांनी मला एकदा सांगितले होते की, सैन्यात काम करणे हे खूप कठीण काम आहे. त्याची कधीही पैशांसोबत तुलना होऊ शकत नाही. मी आईच्या नात्याने सर्व तरुणांना आवाहन करते की, देशाच्या संपत्तीचे नुकसान करू नका.
  5. महेंद्र नाथ पांडे यांनी अग्निपथबाबत बोलताना म्हटले आहे की, केंद्राने सैन्यभरतीसाठी मोठ्या विचाराने अग्निपथ योजना तयार केली आहे. या योजनेमुळे जेव्हा तरुण हायस्कूलची तयारी करतात, त्या वयात त्यांना रोजगार मिळणे शक्य होणार आहे. तसेच त्यांच्यामध्ये एक नवे स्कील देखील डेव्हलप होणार आहे.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.