देशाच्या माजी पंतप्रधानांचा नातू आणि 3000 सेक्स व्हिडीओ, भारताला हादरवणारं प्रकरण नेमकं उघडकीस कसं आलं?
भारताच्या माजी पंतप्रधानांच्या नातवाचं देशातील सर्वात मोठं सेक्स स्कँडल उघड झालं आहे. विद्यमान खासदार असलेल्या प्रज्वल रेवण्णा यांचं स्कँडल नेमकं कसं एक्सपोझ झालं. देशात निवडणुका सुरु असताना या व्हिडीओचा फायदा घेतला का? इतर पक्षांना माहिती असतानाही ते गप्प का बसले? संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.

देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम असताना एका बातमीने सर्वत्र खळबळ उडवून टाकली. विद्यमान खासदाराचे कथित सेक्स व्हिडीओ व्हायरल झाले. देशातील दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या तारखेआधी हे व्हिडीओ व्हायरल झाले. कर्नाटक राज्यामधील जनता दल सेक्युलर पक्षाचे (JDS) हसन लोकसभा मतदरासंघाचे खासदार प्रज्वल रेवण्णा आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओंचा जो काही आकडा समोर आलाय तो ऐकूनच सर्वांना धक्का बसत आहे. एक दोन नाहीतर या विद्यमान खासदाराचे 2976 व्हिडीओ व्हायरल झालेत. निवडणुकीच्या वेळी हाे व्हिडीओ नेमके कोणी बाहेर काढले? यामध्ये कोणा-कोणाचा समावेश आहे? सर्व प्रकरण जाणून घ्या. कोण आहेत प्रज्वल रेवण्णा? कर्नाटकमधील हसन मतदारसंघाचे प्रज्वल रेवण्णा खासदार आहेत. जनता दल...
