पिक्चर अभी बाकी है.. भाजपा, नितीश, तेजस्वी हे काय कमावणार आणि काय गमावणार? 2024 ची समीकरणं काय असणार? घ्या जाणून

भाजपाचे लक्ष्य हे सत्ता मिळवणे हे आहे, तर संयुक्त जनता दलाला त्यांचा सामाजिक आधार वाढवायचा आहे. आता नितीशकुमार यांनी भाजपाची साथ सोडून राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केल्याने पुन्हा नवीन राजकीय समीकरणे उभी राहणार आहेत. या बदलत्या राजकीय स्थितीत तीन्ही मुख्य दलांना काही संधीही आहेत आणि काही धोकेही.

पिक्चर अभी बाकी है.. भाजपा, नितीश, तेजस्वी हे काय कमावणार आणि काय गमावणार? 2024 ची समीकरणं काय असणार? घ्या जाणून
पिक्चर अभी बाकी है..
Image Credit source: social media
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: संदिप साखरे

Aug 10, 2022 | 5:01 PM

पटणा– 2014 साली सत्तेत आल्यानंतर भाजपा (BJP)आक्रमकरित्या विस्तारवादी झालेली आहे. महाराष्ट्र, आसाम, गोवा या ठिकाणी एनडीएतील सदस्यांना पक्षाने गिळंकृत करुन त्या ठिकाणी भाजपा आल्याचे पाहायला मिळाले. बि्हारमध्येही (Bihar)हेच झाले. भाजपाने चिराग पासवान यांच्या मदतीने संयुक्त जनता दलाचे गेल्या विधानसभा निवडणुकीत नुकसान केल्याचे जेडीयूचे (JDU) म्हणणे आहे. पासवान यांच्या मदतीने युतीत भाजपाच्या जागा वाढल्या मात्र जेडीयूच्या जागा घटल्याचे मानण्यात येते. या कारणामुळे ही युती तुटणे हे स्वाभाविकच होते. भाजपाचे लक्ष्य हे सत्ता मिळवणे हे आहे, तर संयुक्त जनता दलाला त्यांचा सामाजिक आधार वाढवायचा आहे. आता नितीशकुमार यांनी भाजपाची साथ सोडून राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केल्याने पुन्हा नवीन राजकीय समीकरणे उभी राहणार आहेत. या बदलत्या राजकीय स्थितीत तीन्ही मुख्य दलांना काही संधीही आहेत आणि काही धोकेही.

बदलासाठी आता भाजपा मागणार मतं

या सत्ताबदलाने एन्टी इन्कबन्सीचा लाभ येत्या काळात भाजपाच्या पदरात पडण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दशकांचा विचार केल्यास बहुतांश काळ राज्यात नितीश यांचीच सत्ता आहे. गेल्या विधानसभेचा विचार केल्यास मतदारांना बदल हवा आहे. या बदलासाठी आता भाजपा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. मात्र सद्यस्थितीत हे सगळं घडलं त्याचं टायमिंग भाजपाच्या विरोधात गेलेलं आहे. पुढच्या लोकसभा निवडमुकीपर्यंत नितीश यांच्यासोबत राहण्याची भाजपाची योजना होती. तोपर्यंत राज्यात संघटना मजबूत करुन नव्या नेतृत्वाला संधी देण्याची भाजपाची योजना असल्याचे सांगण्यात येत होते.

आर्थिक मागास आणि अति मागासलेल्या मतांसाठी जेडीयू आग्रही

बिहार राज्याचा विचार केल्यास, राज्यात 15 टक्के सवर्ण, 26 टक्के आर्थिक अति मागास, 16 टक्के दलित, 17 टक्के मुस्लीम, 11 टक्के कुर्मी-कोईरी आणि 15 टक्के यादव आहेत. यातील अतिमागास आणि दलित मतांमध्ये भाजपा वाटेकरी नको, म्हणून जेडीयूने हे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजदशी त्यांनी महाआघाडी केली आहे. मात्र यात आता जेडीयू राजदच्या मागे चालणारा पक्ष झाला आहे, हा धोका आहे. राजद आता सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्यामुळे सरकारमध्ये राजदचे जास्त चालण्याची शक्यता आहे.

राजदला सत्ता मिळाली पण आव्हाने कायम

राजदला या निमित्ताने सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळाली असली तरी ईबीसीत त्यांची स्वीकार्हतता वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जेडीयूसोबत आल्याने गेल्या काही काळातील आक्रमक प्रतिमा आता गमवावी लागणार आहे. गेल्या निवडणुकीत नोकरीच्या मुद्द्यावर राजद आक्रमक भूमिकेत होती. यंदा मात्र सत्ताधारी असल्याने नितीश यांच्या कारकिर्दीचा मुद्दा ते प्रचारात फारसा उपस्थित करु शकणार नाहीत, हा धोका आहे.

सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे 2024 लोकसभा निवडणुकांचा

2014  साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये राजद-जेडीयू आणि काँग्रेसचे आव्हान रोखण्यात भाजपाला यश येईल का, हा मुख्य प्रश्न आहे. त्यामुळेच ही निवडणूक उ. प्रदेशपेक्षा बिहारमध्ये भाजपासमोर आव्हान असणार आहे. जातीय राजकारणाची मेख कशी जमवता येईल, यावर सगळे उत्तर अवलंबून असण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

महाआघाडीचे मतदार जास्त

राजद आणि जेडीयूचा मतदारांचा बेस ( यादव, कुर्मी, कोईरी, मुस्लीम एकूण 44 टक्के ) हा भाजपाच्या मतदारांच्या (सवर्ण 15 टक्के) यांच्यापेक्षा मोठा आहे. अशा स्थितीत भाजपाला फअलोटिंग वोटर्सकडे लक्ष द्यावे लागेल. 26 टक्के असलेला आर्थिक मागासलेला मतदार आणि 16 टक्के दलित यांच्याकडे लक्ष द्यावे लागेल. त्यातून हे गणित 57 टक्क्यांपर्यंत नेण्यात भाजपाला यश मिळू शकेल. यासह कोइरी आणि यादव समाजातही भाजपाला शिरकाव करावा लागणार आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें