AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 मे पासून आता या स्मार्टफोनमध्ये WhatsApp बंद, मेटाकडून मोबाईलची यादी जाहीर

मोठी बातमी समोर येत आहे, मेटाने मोठा निर्णय घेतला आहे. 5 मे पासून काही मोबाईमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाहीये. अनेक मोबाईमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सेवा बंद करण्यात येणार आहे.

5 मे पासून आता या स्मार्टफोनमध्ये WhatsApp बंद, मेटाकडून मोबाईलची यादी जाहीर
WhatsAppImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 01, 2025 | 7:48 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, मेटाने मोठा निर्णय घेतला आहे. 5 मे पासून काही मोबाईमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाहीये. अनेक मोबाईमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सेवा बंद करण्यात येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप कडून दरवर्षी अशा मोबाईलची यादी काढली जाते, जे खूप जुने झाले आहेत, आणि ज्या मोबाईलमध्ये आता अ‍ॅप अपडेट होऊ शकत नाही. आता पुन्हा एकदा अशाच काही मोबाईलची यादी व्हॉट्सअ‍ॅपकडून जारी करण्यात आली आहे. ज्या मोबाईलमध्ये पाच मे पासून व्हॉट्सअ‍ॅपची सर्व्हिस बंद होणार आहेत.नेमके कोणते आहेत ते मोबाईल त्याबद्दल जाणून घेऊयात.

येत्या पाच मे पासून अनेक मोबाईलमध्ये WhatsApp सेवा बंद होणार आहे. WhatsApp दरवर्षी अशा काही मोबाईलची यादी काढते, ते मोबाईल खूप जुने झाले आहेत. ज्यामध्ये आता अ‍ॅप अपडेट होऊ शकणार नाही.आता व्हॉट्सअ‍ॅप केवळ iOS 15.1 व्हर्जनवाल्या किंवा त्यापेक्षा वरच्या मोबाईलमध्येच काम करणार आहे. याचाच अर्थ ज्यांच्याकडे iPhone 5s, iPhone 6 आणि iPhone 6 Plus हे मोबाईल आहेत, त्यांच्या मोबाईलमध्ये आता WhatsApp सेवा बंद होणार आहे. ज्यांच्याकडे हे मोबाईल आहेत, त्यांना आता व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाहीये.

मेटानं का घेतला निर्णय?

व्हॉट्सअ‍ॅप सतत आपल्या युजर्सला जास्तीत जास्त सुरक्षीत आणि चांगली सेवा, आकर्षक सेवा देण्याचा प्रयत्न करत असते, त्यासाठी कंपनी वारंवार आपल्या अ‍ॅपला अपडेट करते. मात्र जुन्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप अपडेट होऊ शकत नाही. त्यामुळे मेटा दरवर्षी अशा मोबाईलची एक यादी बनवते. या मोबाईलमध्ये आता इथूनपुढे व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाहीये.जुन्या मोबाईलमध्ये सॉप्टवेअर अपडेट होत नाही, त्यामुळे तेथे वापरकर्त्याच्या डाटाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे मेटाकडून अशा मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सेवा पुरवली जात नाही.

व्हॉट्सअ‍ॅप हे महत्त्वाचं मेसिजिंग अ‍ॅप आहे, जगभरात मोठ्या प्रमाणात या अ‍ॅपचा वापर होतो.  यामध्ये अनेक आकर्षक फिचर आहेत, ज्यामुळे जवळपास सर्वच स्मार्ट मोबाईधारक या अ‍ॅपचा वापर करतात.

सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.