AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम मंदिर देणगी चोरीची वाटणी कुठे व्हायची? आरोपीने पोलिसांसमोर केला असा खुलासा

अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. चोरी केलेली रक्कम कुठे वाटली जात होती? याचा खुलासा आरोपीने पोलिसांसमोर केला आहे. या माहितीनंतर पोलिसांनी मोठी रक्कम हस्तगत केली आहे.

राम मंदिर देणगी चोरीची वाटणी कुठे व्हायची? आरोपीने पोलिसांसमोर केला असा खुलासा
राम मंदिर देणगी चोरीची वाटणी कुठे व्हायची? आरोपीने पोलिसांसमोर केला असा खुलासाImage Credit source: TV9 Network
| Updated on: Jul 03, 2026 | 8:12 PM
Share

अयोध्येतील राम मंदिर हे जगभरातील हिंदूंच्या आस्थेचा केंद्र ठरलं आहे. अनेक शतकांच्या लढ्यानंतर हे मंदिर अयोध्येत उभं राहिलं आहे. त्यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेने प्रभू रामांचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत दाखल होत आहेत. तसेच आपल्या परीने शक्य होईल तितकं दान मंदिराच्या दानपेटीत आणि देणगी स्वरूपात अर्पण करत आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून देणगी चोरीच्या प्रकरणामुळे कोट्यवधि भाविकांच्या आस्थेला धक्का बसला. सरकारने या प्रकरणी एसआयटी स्थापन केल्यानंतर झालेल्या चौकशीनंतर आठ जणांना अटक केली आहे. आता या प्रकरणाची चौकशी पुढे जात असताना अनेक घटनांनी आश्चर्याचा धक्का बसला आहे.

राम मंदिराच्या देणगीतून चोरी केलेली रक्कम 14 कोसी परिक्रमा मार्गावर वाटली जायची. अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, कमलेश पांडेय, टिन्नू यादवसहीत या प्रकरणात अटकेत असलेले आरोपी या ठिकाणी पैसे वाटून घेत होते. पोलीस रिमांडमध्ये असलेल्या अविनाश शुक्लाला चौकशी करण्यासाठी त्या जागी घेऊन आले होते. त्याने पोलिसांना पैसे वाटले जाणारी जागा दाखवली. तसेच यावेळी काही धक्कादायक खुलासेही केले. पैसे वाटण्याच्या या जागी काही किमती वस्तू लपवून ठेवल्या होत्या. त्या वस्तूही पोलिसांना जप्त केल्या आहेत.

पोलीसही टिन्नू यादवच्या अधीन!

चोरी प्रकरणात टिन्नू यादवबाबतही धक्कादायक खुलासे होत आहेत. टिन्नू यादवच्या भावाकडे पैसे मोजणाऱ्या रुमची चावी होती. इतकंच काय तर मंदिर परिसरातील सर्व कर्मचारी टिन्नू यादवच्या आदेशाचे पालन करायचे. टिन्नू यादवने मंदिर परिसरात एक वेगळी सिस्टम तयार केली होती. त्याचे पाच नातेवाईक मंदिर परिसरात काम करत होते. टिन्नू यादव त्यांना वॉकी-टॉकीच्या माध्यमातून आदेश द्यायचा. त्यानंतर गाड्यांना आता येण्याची परवानगी मिळायची. या ठिकाणचा पोलीस विभागही टिन्नूच्या अधीन होता, असं चौकशीतून समोर आलं आहे..

व्हिआयपी दर्शन नेटवर्क आणि छोटू

इतकंच काय तर अयोध्येत येणाऱ्या भक्तांना व्हिआयपी दर्शनाचे आमिष दाखवलं जायचं. भक्तांकडून 500 ते 100 रुपये गोळा केले जात होते. श्रीमंतांकडून ही रक्कम 2000 पेक्षा अधिक घेतली जात होती. टिन्नू यादव टोळी व्हिआयपी दर्शनाची सोय करायची. व्हिआयपी दर्शनाचे जाळे केवळ मंदिरापुरतेच मर्यादित न राहता, जवळच्या हॉटेल्सपर्यंतही पसरले होते. व्हीआयपी प्रवेश मार्गावर छोटू हे नाव प्रसिद्ध होते. ज्यांनी हॉटेल घेतले नव्हते, त्यांना छोटूमार्फत दर्शन दिले जात होते.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ