AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UAE मध्ये कोणत्या प्राण्याचं मांस सर्वाधिक खाल्लं जातं? ऐकून तुम्हालाही बसणार नाही विश्वास, अरबांची आवड लईच वेगळी…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या पाच दिवसांच्या विदेश दौऱ्यावर आहेत, याचाच एक भाग म्हणून त्यांनी शुक्रवारी युएईला भेट दिली. या निमित्ताने तेथील संस्कृती आणि खाण-पाणाच्या गोष्टी चर्चेत आल्या आहेत.

UAE मध्ये कोणत्या प्राण्याचं मांस सर्वाधिक खाल्लं जातं? ऐकून तुम्हालाही बसणार नाही विश्वास, अरबांची आवड लईच वेगळी...
muttonImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 17, 2026 | 7:23 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत, याच दौऱ्याचा एक भाग म्हणून त्यांनी शुक्रवारी संयुक्त अरब अमिरातला भेट दिली. अबू धाबीमध्ये त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यूएईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्रपती मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्यासोबत अनेक महत्त्वाच्या करारावर चर्चा केली. या दरम्यान भारत आणि युएईमध्ये पेट्रोललियम आणि गुंतवणुकीसंदर्भात अनेक मोठे करार झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युएई दौऱ्याच्या निमित्ताने आता तेथील संस्कृती आणि तेथील नागरिकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी याची जोरदार चर्चा सुरू आहे. युएईमधील लोकांना कोणत्या प्राण्याचं मांस सर्वाधिक आवडतं? असा प्रश्न देखील अनेकांना पडला आहे.

युएईमध्ये कोणत्या प्राण्याच्या मांसाला सर्वाधिक मागणी?

मार्केट रिसर्च रिपोर्टनुसार युईमध्ये सर्वाधिक खाल्ल जाणासं मांस हे चिकन आहे. युएईमधील जवळपास 80 टक्के लोक हे कोणत्या न कोणत्या प्रकारे मांसाचं सेवन करतात, आणि या मांसामध्ये चिकन हे सर्वात जास्त लोकप्रिय आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे युएईमध्ये मोठ्या प्राणात कोंबड्यांची उपलब्धता हे आहे. युएईमध्ये एक पौष्टिक पदार्थ म्हणून चिकनकडे पाहिलं जातं. युएईमध्ये चिकनचे अनेक स्वादिष्ट आणि युनिक पदार्थ तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पाहयला मिळतात, ज्यामध्ये शोरमा, ग्रील्ड चिकन, चिकन बिरायनी, कबाब या काही प्रसिद्ध डिश आहेत, तसेच फास्ट फुडमध्ये देखील मोठ्या प्रामाणात चिकनचा समावेश होतो.

चिकन नंतर युएईमध्ये मटणाला सर्वाधिक मागणी आहे. खसकरून पारंपारिक अरबी पदार्थांमध्ये मटणाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. विविध धार्मिक कार्यक्रम आणि सणांमध्ये देखील जेवणसाठी मटणाचे पदार्थच जास्त असतात. अरबी मंडी, मटन कबाब, मटण बिरयानी आणि स्लो आगीवर भाजलेल्या मटणाच्या अनेक डीश संयुक्त अरब अमिरातमध्ये लोकप्रिय आहेत. युएईमध्ये मटण आणि चिकन या दोन मांसाच्या प्रकाराला सर्वाधिक मागणी असते. तसेच या माध्यमातून हॉटेल व्यावसायिक दरवर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलढाल देखील करतात.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन