
इराण आणि इस्राईल-US युद्धाच्या तणावामुळे संपूर्ण जगभरात ऊर्जासंकट निर्माण झाल आहे. होर्मेुज स्ट्रेट हा समुद्री मार्ग इराणने बंद केल्याने आता इंधनाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारतात अनेक भागात एलपीजी सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी हॉटेल चालकांना पुन्हा चुलींवर स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे. तर काही कुटुंबात इंडक्शन कुकटॉपचा वापर करुन सिलिंडर टंचाईवर मात केली जात आहे. अशात आपण आज पाहूयात भारताच्या कोणत्या राज्यात एलपीजी वापरकर्त्यांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा किती जण लाभ घेत आहेत ?
उत्तर प्रदेशात एलपीजी वापर करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. एकट्या उत्तर प्रदेशातच सुमारे ४.८७ कोटी एलपीजीचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या आहे. ही देशाच्या एकूण घरगुती एलपीजीचा वापर करणाऱ्या लोकांच्या सुमारे १५ टक्के आहे. मोठी लोकसंख्या आणि गावातील वापर यामुळे एलपीजीचा वापर करण्यात उत्तर प्रदेश सर्वात पुढे आहे.
भारतात ३३.३७ ते ३४ कोटी सक्रीय घरगुती एलपीजीचा वापर करणारे लोक आहेत. गेल्या १० वर्षात सरकारी योजना आणि पुरवठ्याचे वाढलेल्या नेटवर्कमुळे शहर आणि गावातील स्वयंपाकासाठी गॅसचा वापर वाढला आहे, या विस्तारामुळे लाकूड, कोळसा आणि केरोसिनसारख्या पारंपारिक इंधनावरील अवलंबित्व कमी झाले आहे.
उत्तर प्रदेशानंतर अन्य राज्यातही एलपीजीचा वापर करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात सुमारे ३.०२ कोटी लोक एलपीजीचा वापर करतात. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये सुमारे २.७२ कोटी लोक एलपीजीचा वापर करतात. तामिळनाडूत सुमारे २.४ कोटी लोक एलपीजीचा वापर करतात. बिहारात सुमारे २.३३ कोटी लोक एलपीजीचा वापर करतात.
पंतप्रधान उज्ज्वला योजना आर्थिक रुपाने कमजोर कुटुंबियासाठी स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पोहचवण्यात महत्वाची मोठी भूमिका बजावत आहे. ही योजना गरीब कुटुंबासाठी महिलांना एलपीजी कनेक्शन देते. आतापर्यंत या योजनेंतर्गत संपूर्ण देशात एकूण १०.५६ कोटी एलपीजी कनेक्शन देण्यात आले आहेत.
पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांत उत्तर प्रदेश पुन्हा एकदा या यादीत सर्वात पुढे आहे. या राज्यात सुमारे १.८८ कोटी कुटुंबियांना या योजनेंतर्गत एलपीजी कनेक्शन मिळतात. यानंतर पश्चिम बंगालचा नंबर आहे.पश्चिम बंगालमध्ये १.२४ कोटी लाभार्थी आहेत. यानंतर बिहारात सुमारे १.१८ कोटी कुटुंबियांना या योजनंतर्गत लाभ मिळतो.