AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विशेष अधिवेशनसाठी भाजप खासदारांना व्हिप जारी, काय होणार मोठी घोषणा?

New Parliment session : संसदेचं विशेष अधिवेशव हे नव्या संसद भवनात होणार आहे. यासाठी सरकारकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान हे विशेष अधिवेशन चालणार आहे. ज्यामध्ये ४ विधेयकं मांडली जाणार आहेत.

विशेष अधिवेशनसाठी भाजप खासदारांना व्हिप जारी, काय होणार मोठी घोषणा?
| Updated on: Sep 15, 2023 | 11:35 AM
Share

मुंबई : मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले आहे. 18 ते 22 सप्टेंबरपर्यंत हे विशेष अधिवेशन चालणार आहे. त्याआधी सरकारने सर्व पक्षाची बैठक बोलवली आहे. ज्यामध्ये विशेष सत्राबाबत माहिती दिली जाणार आहे. यासाठी सरकारने तयार केली आहे. सर्व मंत्र्यांसाठी सूचना जारी केली आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सर्व मंत्रिमंडळ, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि राज्यमंत्र्यांना सूचना दिल्या आहेत. विशेष अधिवेशनाच्या पाचही दिवस मंत्र्यांना सभागृहाच्या कामकाजादरम्यान संपूर्ण वेळ सभागृहात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

खासदारांना मंत्र्यांना व्हीप जारी

सरकारची ही सूचना अशा वेळी आली आहे जेव्हा विशेष अधिवेशनात काही महत्त्वाचे विधिमंडळाचे कामकाज सरकारला हाताळायचे आहे, अशी चर्चा रंगली आहे. विशेष अधिवेशनात सरकारचा काही छुपा अजेंडा असल्याचे काँग्रेसने आधीच सांगितले आहे. साधारणपणे, दोन्ही सभागृहांच्या (लोकसभा आणि राज्यसभा) कामकाजादरम्यान, एक मंत्री प्रत्येकी 4 तास कर्तव्यावर असतो आणि त्याला त्याच्या रोस्टर वेळेनुसार सभागृहात उपस्थित राहणे बंधनकारक असते. मात्र विशेष अधिवेशनादरम्यान सर्व मंत्र्यांना दोन्ही सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विशेष अधिवेशनाच्या पाचही दिवस सभागृहात उपस्थित राहण्यासाठी भाजपने आपल्या दोन्ही सभागृहांतील खासदारांना व्हिप आधीच जारी केला आहे. 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे, ज्याच्या अजेंड्यात संविधान सभेपासून आजपर्यंतच्या 75 वर्षांच्या संसदीय प्रवासावर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा होणार आहे.

कोणते 4 विधेयक मांडले जाणार

विशेष अधिवेशनात चार विधेयके मांडली जाणार आहेत. ज्यामध्ये अधिवक्ता दुरुस्ती विधेयक, प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पीरियडिकल बिल, पोस्ट ऑफिस बिल आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त नियुक्ती सेवा शर्ती विधेयक यांचा समावेश आहे.

17 सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक

विशेष अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सरकारने 17 सप्टेंबरला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. 17 तारखेला दुपारी 4.30 वाजता ही बैठक होणार आहे. संबंधित नेत्यांना ईमेलद्वारे निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.

नवीन संसद भवनावर ध्वजारोहण

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या एक दिवस आधी नवीन संसद भवनाच्या प्रांगणाच्या गेटवर ध्वजारोहण केले जाणार आहे. यावेळी राज्यसभेचे अध्यक्ष आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला नवीन संसदेच्या प्रांगणात तिरंगा ध्वज फडकवतील. त्यात पीएम मोदीही उपस्थित राहू शकतात. संसदेच्या विशेष अधिवेशनात 19 सप्टेंबर रोजी जुन्या संसद भवनातून नवीन संसद भवनात स्थलांतरित करण्याचा कार्यक्रम होणार आहे.

17 सप्टेंबर रोजी विश्वकर्मा पूजा आहे. भगवान विश्वकर्मा यांना सृष्टीचे देवता तसेच जगातील पहिले शिल्पकार, वास्तुविशारद आणि अभियंता मानले जाते. विशेष म्हणजे याच दिवशी पंतप्रधान मोदींचा वाढदिवसही आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.