Opertation Sindoor चा लोगो कोणी केला तयार ? नावं माहीत आहेत का ?
भारतीय लष्कराच्या मुख्यालयाच्या ऑपरेशन रूमने प्रसिद्ध केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'च्या कमांड सेंटरच्या पहिल्या दृश्यांमधून या लोगोच्या डिझाइनमागील लोक कोण, हे उघड होतंय.

22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं, 26 बळी घेणाऱ्या नृशंसं कांडांचं प्रत्युत्तर म्हणून 7 मे रोजी पहाटे, भारतीय संरक्षण दलांनी “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधल्या 9 दहशतवादी तळांना लक्ष्य करत ते उद्ध्वस्त केले. त्यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले. त्यानंतर 7 मे रोजीच भारतीय संरक्षण मंत्रालयाने एका प्रेस कॉन्फरन्सद्वारे या ऑपरेशनची माहिती देण्यात आली. “भारताविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांची य़ोजना आखण्यात येणाऱ्या पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय सशस्त्र दलांनी कारवाई केल्याचं त्यात स्पष्ट करण्यात आल.” त्यानंतर या मोहिमेची आणि लोगोचीदेखील फक्त भारतात नव्हे तर संपूर्ण जगभरातल चर्चा झाली. तो लोगो कोणी तयार केला, त्याचं डिझाईन कोणाचं, त्यांची ओळख आता समोर आली आहे.
कोणी डिझाईन केला लोगो ?
मिळालेल्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुचवलं होतं. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात पर्यटक पुरूषांना लक्ष्य करण्यात आलं. घरचा कर्ता पुरूष, आपला पती गमावलेल्या महिलांच्या भावना व्यक्त करण्यासाठीच या ऑपरेशला हे नाव देण्यात आल्याची माहिती देखील पुढे आली. त्यामुळे नावाला साजेसाच लोगो तयार करणं महत्वाचं होतं.
ऑपरेशन सिंदूर हे नाव निश्चित झाल्यानंतर त्याचा लोगो तयार करण्याचं काम भारतीय लष्करातील दोन व्यक्तींच्या हाती सोपवण्यात आलं. भारतीय लष्कराच्या मुख्यालयाच्या ऑपरेशन रूमने प्रसिद्ध केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या कमांड सेंटरच्या पहिल्या दृश्यांमधून ऑपरेशन सिंदूरच्या लोगोच्या डिझाइनमागील व्यक्ती कोण हे उघड झालं आहे. या लोगोचं, ते डिझाईन करण्याचं श्रेय लेफ्टनंट कर्नल हर्ष गुप्ता आणि हवालदार सुरिंदर सिंह यांना जातं. त्या दोघांनी मिळून तयार केलेला हाँ लोग संपूर्ण देशातच नव्हे तर अख्ख्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
काळ्या बॅकग्राऊंडवर मोठ्या ठळक अक्षरांमध्ये OPERATION SINDOOR असं लिहीण्यात आलं. त्यांतील सिंदूर शब्दातील एका ओ (O) मध्ये लाल रंगाचं कुंकू (थोडंसं आजूबाजूला) सांडल्याचंही दिसतं. त्यातूनच पहलगाम हल्ल्यात आपला साथीदार, पती, गमावल्याचं महिलांच दु:ख, वेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत. पारंपारिकपणे सिंदूर किंवा कुंकू हे हिंदू महिलांच्या वैवाहिक स्थितीचे प्रतीक आहे आणि ते काढून टाकणे किंवा पुसणं हे वैधव्याचं प्रतीक आहे. म्हणूनच, लोगोमध्ये पसरलेला सिंदूर हाँ गमावलेल्या जीवनाचे आणि त्यांच्या जोडीदारांना गमावलेल्या महिलांच्या दुःखाचे प्रतीक आहे. तसेच “न्याय मिळाला” आणि भारताचा सूड घेण्याचा संकल्प यांचा संदेशही हा लोगो देतो. या ऑपरेशनच्या नावातील ‘ओ’ अक्षर हे लाल सिंदूरच्या वाटीसारखा आकार असलेला आहे, तो केवळ परंपराच नाही तर उत्कटता, शक्ती आणि क्रोधाच्या भावनांचे प्रतीक आहे.
ऑपरेशन सिंदूर आहे काय ?
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, 26 नागरिकांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर “अचूक हल्ले” केले. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद (जेईएम) प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबातील 10 सदस्य आणि चार जवळच्या सहकाऱ्यांसह 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले.
यामध्ये जैशचा बहावलपूरमधील मरकज सुभान अल्लाह, तेहरा कलानमधील सरजल कॅम्प, कोटलीमधील मरकझ अब्बास आणि मुझफ्फराबादमधील सय्यदना बिलाल कॅम्प यांचा समावेश होता. लष्कराचे गड – मुर्डिकेतील मरकज तैयबा, बर्नाला येथील मरकझ अहले हदीस आणि मुझफ्फराबादमधील शववाई नाला छावणीलाही फटका बसला.
