AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shehzad Poonawalla : मी 30 जुलैला राजीनामा दिला, 17 ऑगस्टला काय होणार हे मला..TV वरची भाजपची तोफ शहजाद पूनावाला यांनी का सोडला पक्ष?

Shehzad Poonawalla : शहजाद पूनावाला भाजपमधून बाहेर पडले हा अजूनही अनेकांसाठी धक्का आहे. कारण अजूनपर्यंत त्यांच्या पक्ष सोडण्यामागचं कारण समोर आलेलं नाही. टीव्हीवरच्या डिबेट शो मध्ये भाजपची बाजू तडफेने मांडणारा चेहरा अशी शहजाद पूनावाला यांची ओळख आहे.

Shehzad Poonawalla : मी 30 जुलैला राजीनामा दिला, 17 ऑगस्टला काय होणार हे मला..TV वरची भाजपची तोफ शहजाद पूनावाला यांनी का सोडला पक्ष?
shehzad poonawalla
| Updated on: Sep 15, 2026 | 1:28 PM
Share

टीव्हीवर भाजपची बाजू तडफेने मांडणारा चेहरा म्हणजे शहजाद पूनावाला. काही दिवसांपूर्वी शहजाद पूनावाला यांनी भाजपंमधील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. डिबेट शो मध्ये त्यांना ऐकण्याची सवय असलेल्यांसाठी शहबाज पूनावाला यांचा हा राजीनाम्याचा निर्णय आश्चर्यकारक होता. शहजाद पूनावाला यांनी राजीनाम्यामध्ये काही व्यक्तींचा उल्लेख केला होता. त्यांनी कुठल्याही नेत्याचं नाव घेतलं नव्हतं. आता अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये त्यांनी याच्याशी संबंधित प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. पूनावाला यांनी आतापर्यंत अनेकदा सांगितलं की, ते आर्थिक आणि खासगी कारणांमुळे भाजपं सोडतायत. राजकारणापासून लांब राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

मोजो स्टोरीच्या पॉडकास्ट मध्ये शहजाद पूनावाला सोमवारी अनेक मुद्यांवर बोलले. “बघा, हे जे कोणी लोक आहेत, ते लोक तु्म्ही विचार करताय ते नाहीयत. त्या लोकांबद्दल पक्षात उच्च स्तरावर ज्यांना सांगायचं होतं, त्यांना मी सांगितलं आहे” शहजाद पूनावाला यांनी राजीनाम्यात कुठल्याही नेत्याचं नाव घेतलं नव्हतं. ‘मी पक्ष सोडतोय. पण पंतप्रधान मोदींचा समर्थक राहणार. विचारधारा सोडणार नाही’ असं ते म्हणाले होते.

30 जुलैला मला हे कसं माहित असणार 17 ऑगस्टला काय होणार?

शहजाद पूनावाला यांना कुठल्या मोठ्या पदाची अपेक्षा होती आणि असं नाही झालं तेव्हा त्यांनी पक्ष सोडला का?. सोबतच त्यांना हे सुद्धा विचारण्यात आलं की, अमित मालवीय यांच्या पदाची अपेक्षा होती का?. त्यावर ते म्हणाले की, “मी 30 जुलैला राजीनामा दिला आणि भाजपने बदलाची औपचारिक घोषणा 17 ऑगस्टच्या दुपारी 3-4 वाजता केली. स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, आता 30 जुलैला मला हे कसं माहित असणार 17 ऑगस्टला काय होणार?”

अमित मालवीय काय म्हणाले?

अमित मालवीय मागच्या 11 वर्षांपासून भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख होते.त्यांच्याजागी ऑगस्ट महिन्यात दीपक म्हस्के यांना प्रमुख बनवण्यात आलं. मालवीय त्या निर्णयावर म्हणाले की, “मी विशेष करुन दीपक म्हस्के यांना शुभेच्छा देईन, जे माझ्याजागी भाजपच्या सोशल मिडिया सेलचे प्रमुख म्हणून काम पाहतील. सह संयोजक प्रीति गांधी, शिवानंद द्विवेदी, आलोक भट्ट आणि अरुण यादव यांना सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिल्या”

Follow Us
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले...
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले यांचे मोठे विधान
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध...
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध पास असूनही पोलिसांची अडवणूक
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, मुंबईला रवाना
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन