President Election : नंबरगेमही नाही अन् रिटायरही व्हायचे नाही, पवारांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याची 5 कारणे कोणती?

President Election : शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार होण्यास नकार देण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे नंबर गेम. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार आपल्या ताकदीवर निवडून आणू शकेल एवढी भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीकडे संख्या नाही.

President Election : नंबरगेमही नाही अन् रिटायरही व्हायचे नाही, पवारांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याची 5 कारणे कोणती?
मोदी सर्वात जास्त गोंधळलेले पंतप्रधान, अग्निपथ योजनेवरून राष्ट्रवादीची जहरी टीकाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 1:13 PM

नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (President Election) विरोधी पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी काल दिल्लीत बैठकही झाली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांच्या पुढाकाराने ही बैठक पार पडली. अगदी काँग्रेसपासून ते तृणमूल काँग्रेसपर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी शरद पवार (sharad pawar) यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार राहण्याची गळ घातली होती. मात्र, पवारांनी विरोधकांची विनंती नाकारली. त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. शरद पवार हे मुरब्बी राजकारणी आहेत. आकडेवारी आपल्या हाती असल्याशिवाय ते कोणतीही चाल चालत नाहीत. कोणतीही रिस्क घेत नाहीत. त्यामुळेच ते आजपर्यंत संसदीय राजकारणात अजिंक्य राहिले आहेत. नंबर गेम आणि सक्रिय राजकारणातून निवृत्त न होण्याची इच्छा यामुळे पवारांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढण्यास नकार दिल्याचं सांगितलं जातं.

आकडा नसल्याने पवारांची कच

शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार होण्यास नकार देण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे नंबर गेम. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार आपल्या ताकदीवर निवडून आणू शकेल एवढी भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीकडे संख्या नाही. पण आपल्याला मात मिळेल एवढाही कमी आकडा एनडीएकडे नाहीये. राष्ट्रपतीच्या निवडणुकीतील मतांचे मूल्य 10,86,431 इतके आहे. निवडणूक जिंकण्यासाठी 5,43,216 मते हवीत. एनडीएकडे एकूण 5.26 लाख मते आहेत. तर विरोधी पक्ष आणि अपक्षांकडे एकूण 5.60 लाख मते आहेत. म्हणजे सत्ताधारी आणि विरोधकांकडील मतांमध्ये फारसा फरक नाही.

हे सुद्धा वाचा

पण विरोधकांमध्ये पूर्णपणे एकजूट नाहीये. त्यामुळेच सध्या तरी एनडीए मजबूत दिसत आहे. त्यामुळे पवार कोणतीही रिस्क घेताना दिसत नाही. म्हणूनच ते राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होण्यास नकार देत आहेत. विरोधी पक्ष राष्ट्रपतीपदाची निवडणूक कशी जिंकू शकतो याचा आकडा सांगा, असं खुद्द पवारांनीच विचारलं आहे.

बीजेडी आणि वायएसआरचं मौन

एकीकडे विरोधकांनी राष्ट्रपतीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच काही पक्षांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी पवारांची भेट घेतली. पण पवारांनी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होण्यास नकार दिल्यानंतर आपने विरोधकांच्या बैठकीकडे पाठ फिरवली. त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. तर, बीजेडी आणि वायएसआर काँग्रेससह अकाली दलानेही भूमिका स्पष्ट केली नाही. या तिन्ही पक्षाच्या मदतीशिवाय विरोधक निवडणूक जिंकूच शकत नाही अशी परिस्थिती आहे. यापैकी एक जर पक्ष भाजपच्या बाजूने गेला तरी या निवडणुकीची गणितं पालटणार आहेत.

2017च्या राष्ट्रपती निवडणुकीत बीजेडी आणि वायएसआरने भाजपला पाठिंबा दिला होता. काही दिवसांपूर्वीच दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. ही भेट राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होती असं सांगितलं जात आहे. त्यामुळे बीजेडी आणि वायएसआरशिवाय पवार या निवडणुकीत उतरण्याची रिस्क घेणार नाहीत.

निवृत्त व्हायचं नाहीये

शरद पवार यांची संसदीय कारकिर्द मोठी आहे. राज्यापासून देशातील अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली आहेत. आपल्या कार्याची त्यांनी या पदांवर छापही पाडली आहे. त्यामुळे पंतप्रधानपद असो की राष्ट्रपतीपद असो नेहमीच पवारांच्या नावाची चर्चा होते. पण पवारांनी अनेकदा आपण या पदांच्या स्पर्धेत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आपल्याला सक्रिय राजकारणातून निवृत्त व्हायचं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रपती झाल्यावर चांगली हवेली मिळते. पण तुमच्याशी (मीडिया) संवाद साधण्याची संधी मिळत नाही, असं पवारांनी सांगितलं होतं. त्यावरून पवारांना राष्ट्रपतीपदात काहीच रस नसल्याचं स्पष्ट होत आहे.

सुप्रिया सुळेंच्या राजकीय भवितव्याची चिंता

सुप्रिया सुळे यांच्या राजकीय भवितव्याची चिंता असल्यामुळेही पवार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कच खात असल्याचं दिसून येत आहे. सुप्रिया सुळे या खासदार आहेत. पण त्या अजूनही महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा चेहरा बनलेल्या नाहीत. शिवाय राष्ट्रवादीवर पूर्णपणे त्यांना कमांड घेता आलेली नाही. शरद पवारांचा राजकीय वारसदार म्हणून सुप्रिया सुळेंऐवजी अजित पवार यांच्याकडे पाहिलं जात आहे. पवार जर राष्ट्रपती झाले तर राष्ट्रवादीत फूट पडू शकते. 2019मध्ये देवेंद्र फडणवीसांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन अजित पवार यांनी पवारांना धक्का दिला होता. त्यामुळे पवारांना सुप्रिया सुळे यांच्या राजकीय भवितव्याची चिंता वाटणे स्वाभाविक आहे.

लोकसभा निवडणुकाही आल्या

शरद पवारांची नजर 2024मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर आहे. त्यामुळे त्यांना रिस्क घ्यायची नाहीये. पवार हे राजकारणातील चाणक्य आहेत. त्यामुळे त्यांना याच भूमिकेत राहायचं आहे. काँग्रेसची अवस्था दिवसे न् दिवस बिकट होत आहे. अशावेळी 2024मध्ये राजकीय समीकरणं बदलल्यास ते पवारांच्या पथ्यावर पडण्याची शक्यात आहे. त्यामुळेही पवार वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं सांगितलं जात आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.