AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेलेट गनाचा वापर मनमानी का मानावा? सुप्रीम कोर्टाचा वकिलाला सवाल, CJI सूर्यकांत यांचे मोठे संकेत

Supreme Court CJI Surya Kant: जंतर मंतर आणि इतर ठिकाणी आंदोलक विद्यार्थ्यांवर मॅटेलिक पेलेट गनचा वापर करण्याविरोधात दाखल याचिकेवर गुरुवारी सुप्रीम कोर्टाने सुनावणी घेतली. या दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सरकारला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान काय सांगितले.

पेलेट गनाचा वापर मनमानी का मानावा? सुप्रीम कोर्टाचा वकिलाला सवाल, CJI सूर्यकांत यांचे मोठे संकेत
पेलेट गन, सूर्य कांत, सरन्यायाधीश
| Updated on: Jul 30, 2026 | 12:51 PM
Share

दिल्लीतील जंतर-मंतरवर सीजेपी आंदोलकांवर पेलेट गनचा वापर करण्यात आला. त्याविरोधात दाखल याचिकेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी झाली. सरन्यायाधीश सूर्यं कांत यांच्या पीठाने पेलेट गनचा वापर करण्याविषयी एक प्रोटोकॉल तयार करण्यावर भर दिला. ज्येष्ठ विधीज्ञ वृंदा ग्रोवर यांच्या युक्तीवादानंतर सरन्यायाधीशांनी अति प्रमाणात बळाचा वापर केल्याचा आरोप पाहता पेलेट गन कार्यपद्धती निश्चित करण्यात यावी असा याचिकेचा उद्देश असायला हवा असे म्हटले.

आंदोलकांविरोधात मेटॅलिक पेलेट गनचा वापर झाल्याचा आरोप ज्येष्ठ विधीज्ञ वृंदा ग्रोवर यांनी केला. त्यांनी याविषयी युक्तीवाद केला. मॅटेलिक पेलेट, छर्रे आंदोलकांच्या शरीरातून मिळाल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. पेलेट अनेक प्रकारचे असतात. रबर, प्लास्टिक आणि मॅटेलिक, पण या ठिकाणी मॅटेलिक पेलेटचा वापर करण्यात आल्याचा युक्तीवाद ग्रोव्हर यांनी सुनावणीदरम्यान केला.

पेलेट गनवर सुप्रीम कोर्टाचे म्हणणे काय?

त्यावर न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी पोलिसांचे नियम असाधारण परिस्थितीत पेलेट गनचा वापर करण्याची परवानगी देतात. त्यांनी टिप्पणी केली की, जोपर्यंत तुम्ही या नियमांना आव्हान देत नाहीत, तोपर्यंत टप्प्याटप्प्याने बळाचा वापर करण्याचा पर्याय सुरक्षा दलांकडे असतो. त्यावर वृंदा ग्रोवर म्हणाल्या की, कोणत्याही बळाचा वापर हा जमावाच्या स्वरुपावर अवलंबून असतो.

छऱ्यांच्या वापरावर सवाल

आंदोलक हा काही हिंसक जमाव नव्हता. तरीही त्यांच्यावर छऱ्यांचा वापर करण्यात आला. हा गंभीर चिंतेचा विषय आहे. त्यावर न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी न्यायालय कोणत्याही विशेष प्रकरणात पेलेट गनच्या वापराच्या न्यायालयीन पुनरावलोकन करण्यापासून परावृत्त होत नाही. पण याचिकाकर्त्यांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की, कायद्या सुव्यवस्था टिकवण्यासाठी टप्प्याटप्प्याने बळाचा वापर करण्याची व्यवस्था आहे. विशिष्ट परिस्थितीत गोळी मारण्याची परवानगी आहे. तेव्हा पेलेट गनचा वापर मनमानी का मानावा?

CJI म्हणाले मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करा

सरन्यायाधीशांनी छऱ्यांच्या कथित अधिक वापराच्या आरोपांवर मत व्यक्त केले. त्यांनी अति प्रमाणात बळाचा वापर केल्याचा आरोप पाहता पेलेट गन कार्यपद्धती निश्चित करण्यात यावी असा याचिकेचा उद्देश असायला हवा असे म्हटले. न्यायमूर्ती बागची यांनी नमूद केले की, कोलकत्ता हायकोर्टात एक नियम होता की दारुगोळा वाचवण्यासाठी शरीराच्या इतर भागांवर गोळ्या झाडण्याऐवजी छातीवर गोळ्या झाडल्या जाव्यात. यावर सॉलिसिटर जनरल यांनी टिप्पणी केली की हा नियम वसाहत कालीन, ब्रिटिश कालीन असावा. त्यावर न्यायमूर्ती बागची म्हणाले की, नंतर हा नियम रद्द करण्यात आला. याचिकेत बदल करण्याची सूचना करण्यात आली. प्रकरणात 3 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होईल.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा