AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मद्यपानापूर्वी दारूचे दोन थेंब जमिनीवर का शिंपडतात? अट्टल बेवड्यालाही माहिती नसेल खरं कारण

तुम्ही कधी निरीक्षण केलं आहे का? जेव्हा एखादा व्यक्ती दारू पितो, तेव्हा दारू पिण्यापूर्वी तो आपल्या ग्लासातील दारूचे काही थेंब जमिनीवर शिंपडतो. तो असं का करतो? यामागचं खरं कारण तुम्हाला माहिती आहे का?

मद्यपानापूर्वी दारूचे दोन थेंब जमिनीवर का शिंपडतात? अट्टल बेवड्यालाही माहिती नसेल खरं कारण
Liquor Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 10, 2026 | 6:17 PM
Share

तुम्ही कधी दारू पिली आहे का? किंवा दारू पिणाऱ्या लोकांसोबत बसला आहात का? जर तुम्ही दारू पिणाऱ्या लोकांसोबत बसला असाल तर त्यावेळी तुम्ही एक गोष्ट नक्कीच नोटीस केली असेल, ती म्हणजे जेव्हा ही लोक दारू पिण्यासाठी बसतात तेव्हा ग्लास भरल्यानंतर दारू पिण्याआधी दारूचे काही थेंब जमिनीवर शिंपडतात. हे लोक असं का करतात? नक्की यामागे काय कारण असू शकतं? असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का? जे लोक पहिल्यांदा हे सर्व पहातात त्यांना ही गोष्ट नक्कीच विचित्र वाटू शकते. मात्र ही केवळ एक फक्त सवय नाहीये, तर त्यामागे प्राचीन काळापासून चालत आलेली एक मान्यता आहे. अनेकांना या गोष्टीबद्दल माहिती नसते, मात्र तरी देखील ते दारू पिण्यापूर्वी ती ग्लासात भरल्यानंतर दारूचे काही थेंब जमिनीवर शिंपडतात आणि मगच दारू पिण्यास सुरुवात करतात.

दारू पिण्यापूर्वी ती जमिनीवर शिंपडणं हा काही नवा ट्रेड नाहीये. ही एक खूप जुनी परंपरा आहे. बरं ही परंपरा फक्त भारतामध्येच नाही पाळली जात तर संपूर्ण जगामध्ये तुम्हाला ही गोष्ट पाहायला मिळते, प्रत्येक संस्कृतीमध्ये या कृतीची तुम्हाला वेगळी कथा ऐकायला मिळेल. दारू जमिनीवर शिंपडणं या कृतीचे वेगवेगळ्या देशात वेगवेगळे अर्थ लावले जातात. जेव्हा एखादा व्यक्ती दारू पिण्यासाठी बसतो आणि त्यापूर्वी तो दारूचे काही थेंब जमिनीवर शिंपडतो तेव्हा या कृतीकडे अनेक ठिकाणी अर्पण म्हणून पाहिलं जातं. आपण जेव्हा मद्यपानाचा आनंद घेत असतो, तेव्हा आपल्यामध्ये एक अदृश्य शक्ती उपस्थित असते. त्याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर होऊ नये, म्हणून दारू पिण्याआधी पहिल्यांदा या अदृश्य शक्तीला दारू अर्पण केली जाते. त्यामुळे दारू पिण्यापूर्वी अनेक जण दारू जमिनीवर शिंपडतात, असं म्हटलं जातं. मात्र या गोष्टीला कोणताही आधार नाहीये, ही प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे, ती आजही सुरूच आहे.

काही देशांमध्ये तर दारू पिण्यापूर्वी ती जमिनीवर शिंपडणं हा पूर्वजांना दिलेला सन्मान मानला जातो. काही देशांच्या संस्कृतीमध्ये असं मानलं जातं, की आपले पूर्वज हे आपल्यामध्येच उपस्थित असतात. त्यामुळे दारू पिण्यापूर्वी सर्वात आधी त्यांना दारू अर्पण केली जाते आणि नंतर दारू पिली जाते. तर काही देशांमध्ये असं मानलं जातं की नकारात्मक शक्तींचा आपल्याला कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सर्वात आधी त्यांना दारू अर्पण केली जाते आणि नंतर ती प्राशन केली जाते.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा