AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शपथ घेताना थलपती विजय यांची वेष्टीला नाकारून मॉडर्न लूकला पसंती; त्यामागील खास कारण काय?

Vijay's Oath Ceremony : शपथ घेताना थलपती विजय यांचा मॉडर्न लूक... वेष्टीला नाकारून का दिला फॉर्मल लूक का पसंती? काय आहे त्यामागील खास कारण?

शपथ घेताना थलपती विजय यांची वेष्टीला नाकारून मॉडर्न लूकला पसंती; त्यामागील खास कारण काय?
| Updated on: May 10, 2026 | 12:16 PM
Share

Vijay’s Oath Ceremony : थलपती विजय यांनी आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राजकारणात मोठा इतिहास घडवला आहे. विजय यांनी चेन्नई येथील नेहरू स्टेडियममध्ये सकाळी सुमारे साडेदहा वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या खास प्रसंगी विजय यांचा मॉडर्न लूक पाहायला मिळाला. विजय यांनी शपथविधी सोहळ्यासाठी पारंपरिक पेहरावाऐवजी फॉर्मल लूकला पसंती दिली. शपथविधी सोहळ्यांमध्ये राजकारणी सहसा पारंपरिक धोती आणि वेष्टी परिधान करतात. मात्र, विजय यांनी शपथविधी सोहळ्यासाठी पूर्णपणे वेगळा आणि आधुनिक लूकला पसंती दिली.

विजय यांनी पांढरा शर्ट, काळी पँट आणि फॉर्मल बुटांमध्ये एन्ट्री केला… एखाद्या अभिनेत्याच्या अंदाजा विजय यांनी उपस्थितांचा मनं जिंकली. त्यांनी हा खास लूक तामिळनाडूच्या तरुणांची जुळवून घेण्यासाठी केला आणि हा एक बदल विकासांच्या दिशेने मोठं पाऊल असल्याचं देखील मानलं जात आहे..

याआधी सर्व मुख्यमंत्र्यांनी पारंपरिक लूकमध्ये घेतली शपथ

सांगायचं झालं तर, तामिळनाडू येथील सर्व माजी मुख्यमंत्र्यांनी शपथ विधीसोहळ्यासाठी तेथील पारंपरिक लूकला पसंती दिली. एम. जी. रामचन्द्रन नेहमी त्यांची प्रसिद्ध टोपी, चष्मा आणि पांढरी वेष्टी-शर्ट घालून शपथ घेतली. एम. करुणानिधी हे देखील त्यांच्या पिवळ्या शालीसाठी आणि पांढऱ्या पारंपरिक लूकसाठी ओळखले जात होते. पनीरसेल्वम आणि ई. के. पलानीस्वामी हे देखील पांढरी वेष्टी आणि शर्ट घालायचे. एवढंच नाही तर, एम. के. स्टॅलिन यांनीही 2021 मध्ये पांढरा शर्ट आणि वेष्टी घालून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

विजय यांच्या लूकमागील खास कारण काय?

विजय यांनी शपथविधी सोहळ्यासाठी फॉर्मल लूक केला आणि अनेक वर्षांपूर्वीची जुनी परंपरा मोडीस काढली आहे. विजय यांचा हा लूक जनतेपर्यंत असा संदेश पोहोचवत आहे की, त्यांचं सरकार हे अधुनिक पद्धतीत काम करणारी सरकार असेल. सांगायचं झालं तर, विजय मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार म्हणून पोलिसांचा कडेकोठ बंदोबंस्त होता. स्टेडियमच्या आत आणि बाहेर देखील मोठ्या संख्येत पोलीस उपस्थित होते.

9 नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

आज झालेल्या शपथविधी सोहळ्यात विजय यांच्यासोबतच 9 नेत्यांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतली. थिरू एन. आनंद, सीटीआर निर्मल कुमार, अरुण राज, आधव अर्जुना, कीर्तना, राजमोहन, वेंकटरामनन आणि सेनगोट्टैयान यांची नावं सामिल आहेत.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?