AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“वेगळ्या पक्षाची घोषणा नाहीच”; काँग्रेसमधील ‘या’ दिग्गज नेत्याने स्पष्ट सांगूनच टाकले…

परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राहुल गांधींनी सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांना दिल्लीला बोलावले होते. तर दोन्ही नेत्यांबरोबर त्यांनी स्वतंत्र चर्चा केली होती. गेल्या तीन वर्षांपासून सचिन आणि गेहलोत उघडपणे एकमेकांविरोधात राजकारण करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

वेगळ्या पक्षाची घोषणा नाहीच; काँग्रेसमधील 'या' दिग्गज नेत्याने स्पष्ट सांगूनच टाकले...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jun 07, 2023 | 12:55 AM
Share

जयपूर : देशाच्या राजकारणात आगामी काळातील लोकसभा निवडणुकीबाबत जोरदार चर्चा सुरु असतानाच आता काँग्रेसमधील वाद उफाळून आले आहेत. त्यामुळे सचिन पायलट यांच्याबाबत राजकीय वर्तुळात आता वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ते नवा पक्ष काढत असल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे काही लोकांनी त्यांच्या पक्षाचे नावही जाहीर केले आहे. त्यांच्या पक्षाचे नाव असणार आहे, पुरोगामी काँग्रेस. एका ठिकाणी तर यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्जही केल्याचे सांगण्यात आले. सचिन पायलट 11 जून रोजी नव्या पक्षाची औपचारिक घोषणा करतील असंही काही लोकं सागंत आहेत. त्यामुळे जितकी तोंडं आहेत तितके शब्द असल्याचेही त्यांनी सांगितले.

जबलपूरमध्ये शारदा देवीचे दर्शन आणि पूजा केल्यानंतर सचिन पायलट आता दिल्ली परतले आहेत. सचिन सध्या कोणाला भेटत नाही. मात्र सचिन पायलट कोणताही नवा पक्ष काढणार नसल्याचे निश्चित केले आहे.

ते काँग्रेसमध्ये आहेत आणि राहतील असा विश्वासही त्यांना यावेळी व्यक्त केला आहे. त्यांच्या जवळच्या लोकांवर विश्वास ठेवला तर नवीन पक्ष काढण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

यावेळी त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेस रक्तातच आहे कारण सचिन पायलट 11 जून रोजी जयपूरमध्ये कोणतीही रॅली घेणार नसल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

सचिन पायलट यांनी सांगितले की ते त्यांचे वडील राजेश पायलट यांच्या पुण्यतिथीनिमित्त दौसा येथे श्रद्धांजली सभा घेत आहेत. सचिन यांचे वडील राजेश पायलट यांचे 11 जून 2000 रोजी निधन झाले.

परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राहुल गांधींनी सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांना दिल्लीला बोलावले होते. तर दोन्ही नेत्यांबरोबर त्यांनी स्वतंत्र चर्चा केली होती. गेल्या तीन वर्षांपासून सचिन आणि गेहलोत उघडपणे एकमेकांविरोधात राजकारण करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Follow Us
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...