AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WITT 2025 : रस्ते आणि छतावरील नमाजाचा वादंग फालतू आहे, विकासावर चर्चा व्हावी – चिराग पासवान

WITT 2025: टीव्ही 9 न्यूज नेटवर्कच्या 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' कॉनक्लेव्हमध्ये चिराग पासवान देखील सहभागी झाले होते. चिराग यांनी बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वापासून ते धार्मिक ध्रुवीकरणाबद्दल देखील आपले मत मांडले..

WITT 2025 : रस्ते आणि छतावरील नमाजाचा वादंग फालतू आहे, विकासावर चर्चा व्हावी - चिराग पासवान
| Updated on: Mar 29, 2025 | 8:13 PM
Share

टीव्ही 9 न्यूज नेटवर्कच्या व्यासपीठावर बोलताना केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टी – रामविलास ( एलजेपी – आर )  चिराग पासवान यांनी सडेतोड मते मांडली. ते म्हणाले मी कोणत्याही जात आणि धर्माच्या अंगाने विचार करीत नाहीत आणि अशा कोणत्याही राजकारणाचे समर्थन देखील करीत नाही. चिराग पासवान पुढे म्हणाले की मला केंद्रीय राजकारणाऐवजी राज्याचे राजकारण करायचे आहे आणि आपण बिहार विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहोत असेही ते म्हणाले. बिहारात एनडीएमध्ये असलेले पाच पक्ष नितीश कुमार यांच्या बॅनरखाली निवडणूक लढवतील आणि २४३ पैकी किमान २२५ जागा जिंकतील असेही पासवान यांनी सांगितले.

चिराग पासवान यांना वक्फ विधेयकावर त्यांचे मत विचारले तर केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी सांगितले की मुसलमान लोकातही अनेक लोक असे आहेत ज्यांचा या सुधारणेला पाठींबा आहे. चिराग यांनी सांगितले की माझी ही इच्छा होती हे विधेयक जेपीसीकडे जावे. परंतू जेव्हा लोकांनी या विधेयकावर आपले म्हणणे मांडले तेव्हा समजले की मुस्लीमांमध्येही अनेक लोक या विधेयकाच्या बाजूचे आहेत. तीन तलाक बाबत देखील समज पसरविण्यात आला की संपूर्ण समाज तीन तलाकच्या विरोधात आहे. परंतू असे नव्हते. मी त्यांचा आवाज बनणार आहे जे अल्पसंख्यांकातील अल्पसंख्याक आहेत असे चिराग पासवान यावेळी म्हणाले.

धार्मिक राजकारणाशी घेतली फारकत

चिराग पासवान यांना जेव्हा नमाज आणि औरंगजेब होणाऱ्या राजकारणावर आपले मत काय असा सवाल केला तेव्हा ते म्हणाले की रस्ते आणि छतावर नमाज व्हायला हवा की नको याची चर्चा फालतू आहे. याऐवजी विकासावर बोलले पाहीजे. चिराग याने सांगितले की धर्म व्यक्तीगत श्रद्धेचा विषय आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की जात – धर्माच्या नावाने वाद घालणे बेकार आहे. धर्म लोकांच्या घरापर्यंतच मर्यादित राहीला पाहीजे. चिराग यांनी मंदिर- मस्जिद वादावर योगी आदित्यनाथ यांच्या ऐवजी मोहन भागवत यांच्या वक्तव्यांशी सहमती दाखविली.

Follow Us
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर