AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुसऱ्यांच वाईट करायला गेली, स्वत: जळाली, अरे चंदासोबत हे काय झालं?

महिला आणि तिच्या नवऱ्याने नातेवाईकांना फसवण्याचा प्रयत्न केला. पण त्यामध्ये महिला स्वतःच जळाली... चंदा हिच्यासोबत नेमकं असं झालं तरी काय? घ्या जाणून...

दुसऱ्यांच वाईट करायला गेली, स्वत: जळाली, अरे चंदासोबत हे काय झालं?
| Updated on: May 20, 2026 | 2:08 PM
Share

सध्या जी घटना समोर येत आहे आहे, त्यावर विश्वास ठेवणं जवळपास कठीण आहे. नातेवाईकांना अडचणीत आणण्यासाठी नवरा – बायकोने एक मोठा कट रचला होता. पण यामध्ये महिलेचेच निधन झालं. संपत्तीचे वाद इतके टोकाला पोहोचले की, तपासा दरम्यान पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती मिळाली.. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला असं समजण्यात आलं की, नातेवाईकांनी हल्ला आणि हत्येचा कट रचला आहे. पण तपास जसाजसा पुढे सरकत गेला, तसं धक्कादायक सत्य समोर आलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 मे रोजी एका घरात आग लागल्याची सूचना मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा घरला पूर्ण आग लागली होती. आग विझल्यानंतर, चंदा उर्फ ​​मेहबूबी नावाच्या एका महिलेला गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत घरातून बाहेर काढण्यात आलं. तिला सुरुवातीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि नंतर, तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे तिला लखनऊ येथे हलवण्यात आलं. जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

सुरुवातीला, महिलेच्या पतीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे तिच्या सावत्र भावावर आणि दोन भाच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण, तपासादरम्यान पोलिसांना असे अनेक तथ्य आढळून आले, ज्यामुळे त्यांच्या संशयाची दिशा बदलली. पोलीस अधीक्षक विश्वजीत श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, तपासात असं उघड झालं की, महिलेचा तिच्या सावत्र भावांसोबत मालमत्तेवरून वाद सुरू होता.

सीसीटीव्ही फुटेजमुळे समोर आलं मोठं रहस्य…

पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, चंदा आणि पती राजीव यांनी एक योजना आखली होती. ज्यामुळे त्यांनी संपूर्ण घराला आग लावून नातेवाईकांना फसवण्याचा कट होता. तपासादरम्यान असं समोर आलं की, राजीव जेरीकॅन घेऊन घराभोवती फिरताना दिसला.

पोलीस चौकशीत राजीव याने गुन्हा मान्य केला की, चंदा हिच्यासोबत घराला आग लावली होती. पण स्वतःच लावलेल्या आगीत चंदा स्वतःच जळून खाक ढाली… आता पोलिसांनी याप्रकरणी नवरा राजीव याच्या शिवाय, भाई शफी अहमद आणि भाचा शमी अहमद यांना अटक केली आहे. सध्या पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Follow Us
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार