महाकुंभमधून येताच नवरा बायकोच्या खोलीत शिरला, हळूच दरवाजा उघडला आणि… असं काय घडलं तिथे?
हरियाणातील चरखी दादरी येथे कुंभमेळ्यानंतर एका महिलेचा संदिग्ध मृत्यू झाला. पूजा नावाची ही महिला कुटुंबासोबत कुंभमेळ्यास गेली होती आणि घरी परतल्यानंतर अचानक आजारी पडली. तिला रुग्णालयात नेण्यात आले, पण तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, विषारी पदार्थ सेवनाचा संशय आहे.

हरियाणातील चरखी दादरी शहरात एका महिलेचा संदिग्ध अवस्थेत मृत्यू झाला. ही महिला कुंभमध्ये कुटुंबासोबत अंघोळीला गेली होती. स्नान करून ती घरी आली. घरातील लोक गाडीतून सामान उतरवत होते. त्याचवेळी ती छतावर बनवलेल्या रुममध्ये गेली. तिच्या मागेच तिचा नवराही घरात पोहोचला. त्याने अत्यंत प्रेमाने हळूच घराचा दरवाजा उघडला. बघतो तर काय? त्याची बायको बेशुद्ध पडलेली दिसली. त्यामुळे तो अत्यंत घाबरला. घामाघूम झाला. लोकांना गोळा करण्यासाठी त्याने एकच हंबरडा फोडला. असं काय घडलं होतं तिथे?
या महिलेची प्रकृती बिघडल्यावर तिचे नातेवाईक तिला रुग्णालयात घेऊन गेले. तिथे उपचार सुरू असतानाच या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचं नाव पूजा असं आहे. ती चरखी दादरी येतील एमसी कॉलनीत राहते. तिचा मृतदेह चरखी दादरीमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आलं होतं. पूजाचा नवरा अशोक यांनी या घटनेची माहिती दिली. पूजा तिचा नवरा अशोक, सासरा हरिराम, दीर विकास, विकासची बायको आणि विकासच्या बहिणीसोतब 7 फेब्रुवारी रोजी कुंभमेळ्यात गेले होते. तब्बल सात दिवस हे सर्वजण कुंभमध्ये राहिले होते. गंगा नदीत जाऊन त्यांनी स्नानही केलं होतं. त्यानंतर आठ दिवसाने ते घरी आले. घरी आल्यावर मात्र, तिने जीव सोडला.
घरी येताच उलट्या करू लागली
घरी आल्यावर पूजा छतावरील खोलीत गेली होती. तिथे तिला उलट्या झाल्या. उलट्या करून करून बेजार झालेली पूजा नंतर बेशुद्ध पडली. त्यामुळे तिच्या नवऱ्याने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. पूजाच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. पूजाच्या घरच्यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. त्यानंतर तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं.
चुकून विषारी पदार्थ खाल्ला
या प्रकरणाची चौकशी पोलीस अधिकारी बबिता या करत आहेत. बबिता यांच्या माहितीनुसार, पूजा ही बवानाच्या महेंद्रगडची राहणारी आहे. तिचे वडील सतबीर यांचीही साक्ष नोंदवण्यात आली आहे. पूजाने चुकून विषारी पदार्थ खाल्ला होता. त्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे, असं तिच्या वडिलाने म्हटलं असल्याचं पोलीस अधिकारी पूजा यांनी सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. मात्र, पूजाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे तिच्या घरच्यांना मोठा धक्का बसला असून ते अद्यापही या घटनेतून सावरलेले नाहीत.