महिला चेक घेऊन बँकेत घुसली, नाव वाचून मॅनेजर हादरला, पोलिसांनाही बसला जबर धक्का
एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. ही घटना नवी दिल्लीमधील आनंद निकेतनमध्ये घडली आहे, या घटनेमुळे पोलीसही हादरले आहेत.

एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. ही घटना नवी दिल्लीमधील आनंद निकेतनमध्ये घडली आहे. केटी नावाची एक महिला आनंद निकेतनमध्ये वास्तव्याला आहे, तीने आपल्या घरात कामासाठी एक बाई ठेवली जीचं नाव राणी आहे. राणीने केटी यांच्या घरी काही महिने काम केलं, त्यानंतर ती अचानक कोणालाही काहीही न सांगता केटीच्या घरातून बेपत्ता झाली. ती पुन्हा कधीच घरी आली नाही. मात्र त्यानंतर जे कांड घडलं, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 24 जुलै 2025 रोजीची आहे, केटीला असं कळलं की तिच्या नावानं सिमडेगा येथील एका बँकेत कोणीतरी पाच लाख रुपयांचा चेक वठवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र केटीने कोणालाही कधीच पाच लाख रुपयांचा चेक दिला नव्हता, केटीला जेव्हा हा प्रकार कळाला तेव्हा तिला मोठा धक्का बसला. मात्र त्यापूर्वीच बँक मॅनेजरच्या सतर्कतेमुळे मोठा स्कॅम टळला आहे. मॅनेजरला शंका आल्यानं त्याने तातडीने दिल्ली पोलिसांशी संर्पक साधला, तेव्हा त्याला असं कळालं की हा चेक केटी नावाच्या महिलेचा असून तो तिच्या घरातून चोरी झाला आहे.
त्यानंतर केटीने देखील राणीविरोधात दिल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आपल्या घरातून चेक चोरी झाल्याचं तिने म्हटलं. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली आणि राणी सिमडेगा येथे जिथे राहात होती, त्या घरावर छापा टाकला, तिला अटक केली. तिने चौकशीमध्ये आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे.
पोलिसांना राणीची कहाणी ऐकून प्रचंड धक्का बसला, राणीला चार मुलं आहेत. ती एक गरीब कुटुंबातील असून, दिल्लीमध्ये मजुरीचं काम करत होती. चेकची चोरी करून, बँकेची फसवणूक करून पाच लाख रुपये मिळवण्याचा तिचा प्लॅन होता. मात्र आता पोलिसांनी तिला अटक केली आहे, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
