AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : आधी झिंज्या उपटल्या, मग खाली पाडलं, त्यानंतर तुफान हाणामारी… टिळा लावण्यावरून तिघी भिडल्या

Viral Video : हरिद्वारच्या प्रसिद्ध हरकी पौडी भागात भक्तांना टिळा लावण्यासाठी तीन महिला एकमेकींशी भिडल्या. महिलांमध्ये जोरदार मारामारी झाली. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.

Viral Video : आधी झिंज्या उपटल्या, मग खाली पाडलं, त्यानंतर तुफान हाणामारी... टिळा लावण्यावरून तिघी भिडल्या
Har Ki Pauri fightImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 30, 2025 | 1:12 PM
Share

हरिद्वारच्या हरकी पौडी भागात बुधवारी यात्रेकरूंना टिळा लावण्यावरून तीन महिलांमध्ये जोरदार वाद झाला. पाहता पाहता शाब्दीक वार हाणीमारीपर्यंत जाऊन पोहोचला. तिन्ही महिलांनी एकमेकींचे केस ओढले, कपडले फाडले, एकमेकींना लाथा बुक्क्यांनी मारले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ रस्त्यावरील लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.

काय आहे व्हिडीओ?

हरकी पौडी येथील तीन महिलांमध्ये सुरु असलेला वाद पोलिसांपर्यंत पोहोचताच ते तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तिन्ही महिलांना ताब्यात घेऊन चौकीत आणले. चौकशीत समजले की तिन्ही महिला हरकी पौडी आणि आसपासच्या घाटांवर येणाऱ्या यात्रेकरूंना टिळा लावून पैसे मागण्याचे काम करतात. बुधवारी यात्रेकरूंना आधी टिळा लावण्यावरून त्यांच्यात परस्पर वाद झाला, नंतर त्याचे रुपांतर मारामारीत झाले.

वाचा: महिला डॉक्टर प्रकरणी PSI बदने कचाट्यात सापडलाच, पोलिसांच्या हाती पुराव्यांचं घबाड, थेट नातेवाईकांनीच…

पोलिसांनी तिन्ही महिलांना दिली कठोर सूचना

पोलीस अधिकारी रितेश शाह यांनी सांगितले की तिन्ही महिलांची ओळख पटवली आहे. पोलिसांनी त्यांना कठोर इशारा देत भविष्यात असे वर्तन न करण्याची सूचना दिली आहे. पोलिस कायद्याच्या कलम ८१ अंतर्गत चालान दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांनी महिलांना धार्मिक स्थळी किंवा भक्तांसोबत असे वर्तन कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही.

धार्मिक स्थळाची प्रतिष्ठा टिकवणे सर्वांची जबाबदारी – पोलिस

पोलिसांचे म्हणणे आहे की हरकी पौडीसारख्या संवेदनशील आणि धार्मिक महत्त्वाच्या स्थळाची प्रतिष्ठा टिकवणे सर्वांची जबाबदारी आहे. अशा प्रकरणांमध्ये भविष्यात कोणतीही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. सध्या तिन्ही महिलांनी आपली चूक मान्य करत माफी मागितली आहे. पोलिसांनी भागात बंदोबस्त वाढवला आहे जेणेकरून पुन्हा अशी घटना घडणार नाही. उत्तराखंडचा हरिद्वार भाग भक्तांसोबतच पर्यटकांची पहिली पसंती आहे, येथे दररोज मोठ्या संख्येने लोक फिरण्यासाठी येतात.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.