लाकूडतोड करणारा मजूर एका रात्रीत झाला करोडपती, बिहारच्या किशनगंजमध्ये अफवांना ऊत; चौकशीही होणार

| Updated on: Jan 16, 2022 | 1:36 PM

बिहार(Bihar)च्या किशनगंज(Kishanganj)मध्ये एक गरीब लाकूडतोड करणारा व्यक्ती (Wood Cutter)रातोरात करोडपती झालाय. त्यामुळे गावात अफवांना ऊत आलाय. हे प्रकरण एसडीएम(SDM)पर्यंत पोहोचल्यावर त्यांनी गांभीर्यानं घेत चौकशीचे आदेश दिलेत.

लाकूडतोड करणारा मजूर एका रात्रीत झाला करोडपती, बिहारच्या किशनगंजमध्ये अफवांना ऊत; चौकशीही होणार
किशनगंज, बिहार
Follow us on

बिहार(Bihar)च्या किशनगंज(Kishanganj)मध्ये एक गरीब लाकूडतोड करणारा व्यक्ती (Wood Cutter)रातोरात करोडपती झालाय. त्यामुळे गावात अफवांना ऊत आलाय. गावकर्‍यांचं म्हणणं आहे, की लतिफ आणि त्याचा मुलगा उबेलुदल यांना १५ दिवसांपूर्वी कुठूनतरी गुप्तधन मिळालं, त्यामुळे ते श्रीमंत झाले. त्याचवेळी काही लोकांचं म्हणणं आहे, की त्यांनी लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं ज्यामध्ये त्यानं 1 कोटी रुपये जिंकले होते. हे प्रकरण एसडीएम(SDM)पर्यंत पोहोचल्यावर त्यांनी गांभीर्यानं घेत चौकशीचे आदेश दिलेत.

अफवांना ऊत

हे प्रकरण किशनगंज टाउन पोलीस स्टेशन परिसरातल्या तेउसा पंचायतीतलं आहे. याठिकाणी एक गरीब लाकूडतोड करणारा रातोरात करोडपती झालाय. हे पाहून गावातल्या लोकांना आश्चर्य वाटले. त्यानंतर विविध अफवांना ऊत आला आणि भीतीपोटी दोघंही भूमिगत झाले. इतके पैसे मिळाल्यानंतर लाकूडतोड करणाऱ्या उबेदुलनं नातेवाईकांना सात दुचाकीही भेट दिल्याचं गावकरी सांगतात. नवीन ट्रॅक्टर आणि काही बिघे जमीन घेतली. याशिवाय पक्कं घर बांधण्यात आलं.

कायद्याच्या कचाट्यात सापडू नये, म्हणून…

बिहारमध्ये लॉटरीच्या तिकिटांवर बंदी आहे, त्यामुळे त्यानं बंगालमधून लॉटरीचं तिकीट घेतलं होतं. पण कायद्याच्या कचाट्यात सापडू नये, म्हणून पिता-पुत्र कुठंतरी भूमिगत झाले. पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत. दोघांना पकडल्यानंतरच या प्रकरणाचा खरा खुलासा शक्य होणार आहे.

किशनगंजमध्ये चर्चेचा विषय

किशनगंजचे एसडीएम शाहनवाज अहमद नियाझी म्हणाले, की प्राप्तिकर विभाग आणि ईडी याबाबतचा तपास करतील. त्याचबरोबर मनी लाँड्रिंगचं प्रकरण समोर आलं तर पडद्यामागे दडलेल्या लोकांचाही पर्दाफाश होईल, असंही ते म्हणाले. सध्या ही बाब किशनगंजमध्ये चर्चेचा विषय बनलीय. अखेर एका रात्रीत एवढे पैसे आले तरी कसे?

Corona Cases India : कोरोना रुग्णसंख्येत वाढ कायम, देशात 2 लाख 71 हजार नवे रुग्ण, 314 जणांचा मृत्यू

Republic Day | पथसंचलन पाहण्यासाठी फक्त 24 हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था, प्रजासत्ताक दिनी यंत्रणा अलर्टवर

Kiran Mane : मी बी कंबर कसलेली हाय… फेसबुकवर पोस्ट शेअर करत अभिनेते किरण माने यांनी दिला इशारा!