World Population Day : जगात कोणत्या 10 देशाची लोकसंख्या जास्त आहे?

भारताचा जीडीपी सध्या ग्रेट ब्रिटनच्या बरोबरीला असला तरी लंडनची लोकसंख्या खूपच कमी आहे. भारताची लोकसंख्या 140 कोटीच्याही पुढे गेली आहे. लंडनच्या इकॉनॉमीला भारताने मागे टाकले आहे. परंतू सायबाच्या देशाची लोकसंख्या दिल्ली एवढी आहे. त्यामुळे भारताच्या लोकसंख्येला लगाम घालावा लागणार आहे.

World Population Day : जगात कोणत्या 10 देशाची लोकसंख्या जास्त आहे?
11 july 2024 world population dayImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 4:47 PM

लोकसंख्येचा विस्फोट होईल अशी परिस्थिती सध्या देशात आहे. भारताची लोकसंख्या प्रचंड वाढत चालली आहे. चीन आधी आपल्या पुढे गेला होता. परंतू आता चीनने त्यांच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणले आहे. परंतू आपला भारत आता जगातला सर्वाधित लोकसंख्येचा देश बनला आहे. साल 2023 मध्ये भारताची लोकसंख्या 142 कोटी 86 लाख 27 हजार 663 इतकी होती. त्यात एका वर्षात 18.1 टक्क्यांची वाढ झाली आहे. आता साल 2024 मध्ये भारताची लोकसंख्येचा अक्षरश: विस्फोट झाला आहे. भारताची लोकसंख्या आता या एका वर्षात 144 कोटी 17 लाख 19 हजार 852 इतकी झाली आहे. त्यामुळे भारतातील कोणतीही योजना कितीही चांगली असली किंवा देशाचा जीडीपी सध्या लंडनच्या बरोबरीला असला तरी लंडनची लोकसंख्या साल 2023 मध्ये 6 कोटी 77 लाख 36 हजार इतकी होती. त्यामुळे लंडनच्या इकॉनॉमीला आपण मागे टाकले असले तरी तेथील लोकसंख्येमुळे दरडोई उत्पन्नात आपण मागेच राहाणार आहे.

जागतिक लोकसंख्या दिन ( 11 जुलै ) साजरा होत असताना आपण वाढत्या लोकसंख्येच्या निमित्ताने जागरुकता पसरविणे गरजेचे आहे, विकासावर या वाढत्या लोकसंख्येचा होणारा परिणाम याविषयीही  जागरुकता पसरविणे गरजेचे आहे. जगातील लोकसंख्या असलेले देश आपण पाहीले तर भारतानंतर चीन – 1,425,178,782, अमेरिका – 341,814,420, इ़ंडोनेशिया – 279,798,049, पाकिस्तान – 245,209,815, नायजेरिया – 229,152,217, ब्राझिल-217,637,297, बांग्लादेश-174,701,211, रशिया – 143,957,079, इथोपिया – 129,719,719 अशी लोकसंख्या साल 2024 मध्ये वाढल्याचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत.

Rank Country Name2024 Population2023 PopulationWorld
1भारत1,441,719,852 1,428,627,66318.01%
2चीन1,425,178,7821,425,671,35217.80%
3अमेरिका341,814,420339,996,5634.27%
4इंडोनेशिया279,798,049277,534,1223.50%
5पाकिस्तान245,209,815240,485,658 3.06%
6नायजेरिया229,152,217 223,804,632 2.86%
7ब्राझिल 217,637,297216,422,4462.72%
8बांग्लादेश174,701,211172,954,3192.18%
9रशिया143,957,079 144,444,3591.80%
10इथिओपिया 129,719,719126,527,0601.62%

भारत जगात पाचवी महासत्ता बनणार

भारत लवकरच पाचवी आर्थिक महासत्ता होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. परंतू कोरोनाकाळात भारताने देशातील 80 कोटी जनतेला रेशनवरुन मोफत धान्य पुरविण्याची योजना यशस्वीपणे राबविली. इतक्या मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण कोणताही फारसा मोठा अडथळा न येत्या सुखरुपपणे पार पडले. भारताची इतकी मोठी लोकसंख्य असूनही भारतातील धान्य कोठारे अन्नधान्यांनी भरलेली आहेत. हा अवाढव्य खंडाप्रमाणे असलेला देश सुरळीत चालला आहे. परंतू इतक्या जमेच्या बाजू असल्या तरी भारतीय लोकसंख्या जर आटोक्यात राहीली तर जगात भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही असे म्हटले जात आहे.

Non Stop LIVE Update
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?.
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?.
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी.
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?.
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम.
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.