यज्ञ थेरपीने डायबिटीज, कॅन्सर आणि हृदयविकार नियंत्रणात येऊ शकते, पतंजलीच्या संशोधनात दावा
पतंजली हर्बल संशोधन विभाग, पतंजली संशोधन प्रतिष्ठान, हरिद्वार या संस्थेने एक संशोधन केले आहे.यज्ञ थेरपीवर झालेल्या संशोधनात आढळले की या थेरपीने डायबिटीज, हार्ट डिसिज आणि कॅन्सरच्या लक्षणांना देखील उपचाराने कमी केले जाऊ शकणार आहे. या संशोधनाला इंटरनॅशनल जर्नल ऑफ इमर्जिंग टेक्नॉलॉजीस ( IJEET ) मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

पतंजली हर्बल संशोधन विभाग, पतंजली संशोधन प्रतिष्ठान, हरिद्वार यांनी एक संशोधन केले आहे. यज्ञ थेरेपीवर झालेल्या संशोधनातून उघडकीस आले आहे की या थेरपीने डायबिटीज, हार्ट डिजीस एवढच काय तर कॅन्सरच्या लक्षणांना कमी केले जाऊ शकते. या संशोधनाला इंटरनॅशनल जर्नल ऑफ इमर्जिंग टेक्नॉलॉजीस ( IJEET ) मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
भारतात प्राचीन काळात यज्ञाच्या महत्वासंदर्भात सांगितले आहे. यज्ञाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व तर आहेच, शिवाय याच्या मदतीने अनेक आजारांना नियंत्रणात आणले जाऊ शकते. यज्ञात विशेष प्रकारच्या आयुर्वेदिक जडी बुटींचा वापर करुन आजाराच्या लक्षणांना कमी केले जाऊ शकते. याला यज्ञ थेरपी म्हटले जाते. यज्ञ थेरपीन डायबिटीज, कॅन्सल आणि हार्ट डीसीज नियंत्रण केला जाऊ शकतो. आणि त्याच्या लक्षणांना कमी केले जाऊ शकते. पतंजली हर्बल संशोधन विभाग, पतंजली संशोधन प्रतिष्ठान, हिरद्वार येथील रिसर्च मध्ये ही माहीती उघडकीस आली आहे. या संशोधनाला जगप्रसिद्ध इंटरनॅशनल जर्नल ऑफ इमर्जिंग टेक्नॉलॉजीस ( IJEET ) मध्ये प्रकाशित केले आहे.
यज्ञ थेरपी एक पारंपारिक भारतीय उपाचाराची पद्धत असून या हवन आणि मंत्रांच्या उच्चारणाने शारीरिक आणि मानसिक आरोग्याला चांगले करण्याचा प्रयत्न केला जातो. पतंजलीच्या संशोधकांनी यज्ञ थेरपीला एक पूरक देखभालीच्या रुपात उपयोग करण्याचा प्रयत्न केला आहे.संशोधनानुसार यज्ञ थेरपीत पतजंलीच्या दिव्य फार्मेसीच्या विशेष औषधी जडी बुटींचा वापर करीत हायबिटीज, कॅन्सर आणि हृदयाच्या आजाराला नियंत्रण केले जाऊ शकते. या थेरपीने वातावरण शुद्ध करण्यास मदत मिळते.
यज्ञ थेरपीत उपयोगात आणली जाणारी सामुग्रीत औषधीय गुणांची जडी-बुटींचे मिश्रण असते. ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक तणावातून आराम मिळतो. आजारावर नियंत्रण मिळवण्यासोबतच यज्ञ थेरपीने झोपेच्या गुणवत्त सुधारणा होते. मेटाबॉलिज्मला चांगले बनवते.हे कॅन्सरच्या रुग्णांना वेदना आणि कमजोरीला कमी करते.
असे झाले संशोधन –
या संशोधनात ९ रुग्णांचा समावेश केला गेला होता.त्यात ३ कॅन्सर, ३ डियबिटीज आणि ३ हार्ट डिजीसने पीडित होते. यज्ञ थेरपीचा या रुग्णाच्या जीवनातील गुणवत्तेत काय सुधारणा होते की नाही यावर संशोधन झाले. याचा रुग्णावर काय फायदा होणार याची पाहणी केली गेली. संशोधनादरम्यान रुग्णाला यज्ञ थेरपी दिलेली होती त्यात विशिष्ट हवन सामुग्रीचा वापर केला गेला. यात पतंजलीच्या दिव्या फार्मसीचा वापर झाला. या गिलोय, शतावरी, लिंबू आणि दालचीनी सारख्या जडीबुटी होती. संशोधनातून दरम्यान रुग्णांना योगसन करण्यास सांगितले.
संशोधनात रुग्णांचे अनेक पॅरामीटर तपासले गेले उदाहरणार्थ वजन घटवणे, थकव्याची पातळी, भूक न लागणे, अपचन, जेवताना अडचणी, झोपेची समस्या, शरीरातील वेदना, श्वास घेताना अडचणी हे पॅरामीटर तापसले, अनेक दिवसाच्या अभ्यासानंतर डायबिटीजच्या रुग्णांना यज्ञ थेरपीने डायबिटीज नियंत्रणात आला. हृदय विकारात आराम मिळाला.सर्वात आश्चर्य म्हणणेज या थेरपीने कॅन्सरच्या तिन्ही रुग्णला फायदा झाला.
कॅन्सर ट्यूमरचा साईज घटले –
संशोधनातून असे दिसून आले की ज्या रुग्णाला घशाचा कर्करोग होता आणि त्यास कोणतीही वस्तू खाण्यात आणि गिळण्यात अडचण येत होती. त्या रुग्णाच्या घशातील ट्युमरचा आकार यज्ञ थेरपीनंतर कमी झाल्याचे दिसून आले. ज्या रुग्णाला गर्भाशयाचा कर्करोग झाला होता त्याची यापूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. परंतू शस्त्रक्रियेनंतरही त्याला पोटदुखी आणि इतर लक्षणे जाणवत राहिली. यज्ञ उपचारानंतर, रुग्णाला पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि कमाजोरीपासून आराम मिळाला. यावरून असे दिसून येते की यज्ञ थेरपीच्या मदतीने केवळ मधुमेह आणि हृदयरोगच नाही तर कर्करोगाची लक्षणे देखील कमी करता येतात.
