Zydus Cadila ZyCoV-D Vaccine | भारताच्या आणखी एका स्वदेशी लसीला मंजुरी, आता 12 वर्षावरील सर्वांना लस मिळणार

| Updated on: Aug 20, 2021 | 8:40 PM

ZyCoV-D vaccine | देशातील आघाडीची औषध निमिर्ती कंपनी झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila) ZyCoV-D या लसीला अखेर औषध महानियंत्रक अर्थात डीसीजीआयने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. ZyCoV-D लसीने सुरक्षिततेचे सर्व निकष पूर्ण केल्यामुळे डीजीसीआयने हा निर्णय घेतला आहे. ही लस पूर्णपणे स्वदेशी असून डीएनएवर आधरित असणारी जगातील पहिली लस आहे.

Zydus Cadila ZyCoV-D Vaccine | भारताच्या आणखी एका स्वदेशी लसीला मंजुरी, आता 12 वर्षावरील सर्वांना लस मिळणार
ZYDUS CADILA
Follow us on

मुंबई : देशातील आघाडीची औषध निमिर्ती कंपनी झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila) ZyCoV-D या लसीला अखेर औषध महानियंत्रक अर्थात डीसीजीआयने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. ZyCoV-D लसीने सुरक्षिततेचे सर्व निकष पूर्ण केल्यामुळे डीजीसीआयने हा निर्णय घेतला आहे. ही लस पूर्णपणे स्वदेशी असून डीएनएवर आधरित असणारी जगातील पहिली लस आहे. देशात आणखी एक लस उपलब्ध झाल्यामुळे आता लसीकरणाला गती येण्याची शक्यता आहे. (Zydus Cadilas ZyCoV-D Corona vaccine gets emergency use approval in India by DCGI)

12 वर्षांवरील सर्वांसाठी लस

मागील काही आठवड्यांपासून झायडस कॅडिला कंपीन त्यांच्या ZyCoV-D या डीएनएवर आधारीत असलेल्या लसीला आपत्कालीन वापराची परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न करत होती. त्यासाठी कंपनीने डीसीजीआयकडे रितसर अर्जसुद्धा केला होता. तोच अर्ज मंजूर करुन डीसीजीआयने ZyCoV-D या लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. दिलेल्या मंजुरीनुसार ZyCoV-D ही लस आता 12 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मुलांना तसेच 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्व नागरिकांना देता येईल.

डीएनएवर आधारित कोरोना लस

झायडस कॅडिलानं डीएनए आधारित कोरोना लसीची निर्मिती केली आहे. डीएनएवर आधारित असणारी कोरोनावरील जगातील ही पहिली लस आहे. या लसीमध्ये कोरोना विषाणूच्या डीएनएच्या जेनेटिक कोडचा वापर करण्यात आला आहे. यामुळे लस घेतल्यानंतर व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.

झायडस कॅडिलाच्या लसीचे तीन डोस घ्यावे लागणार

झायडस कॅडिलाच्या लसीचे तीन डोस घ्यावे लागणार आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 28 व्या दिवशी तर तिसरा डोस 56 व्या दिवशी घ्यावा लागणार आहे. झायडस कॅडिलाकडून दोन डोसबाबात संशोधन सुरु आहे.

इतर बातम्या :

सरन्यायधीश रामन्नांचं स्वप्न साकारलं, आता हैदराबादमध्ये आंतरराष्ट्रीय लवादाचं केंद्र

सोनियांच्या बैठकीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह 19 पक्षांचे नेते, सोनियांचं संपूर्ण भाषण एका क्लिकवर

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प वाढ, मात्र सक्रिय रुग्णसंख्या 150 दिवसांतील निचांकी

(ydus Cadilas ZyCoV-D Corona vaccine gets emergency use vaccine in India by DCGI)