नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारविरोधात काँग्रेससह विविध राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात आज विरोधी पक्षाच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 19 पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात संसदेतील विरोधकांच्या एकीचं कौतुक केलं. संसदेच्या भविष्यातील अधिवेशनातही ही एकता कायम राहील. मात्र, आपल्याला बाहेरही मोठी राजकीय लढाई लढावी लागेल, अशी सूचनाही सोनिया गांधी यांनी दिली आहे. (Sonia Gandhi’s entire speech in the Meeting of Leader of Opposition’s )