Yogi Adityanath : PM मोदींनी आवाहन करताच योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी झटपट उचलली पावलं

Yogi Adityanath-Devendra Fadnavis : मध्य पूर्वेतील इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काही महत्वाची आवाहन केली आहेत. भाजप शासित राज्यांनी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश यांनी झटपट काही निर्णय घेतले आहेत.

Yogi Adityanath : PM मोदींनी आवाहन करताच योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी झटपट उचलली पावलं
Yogi Adityanath-Devendra Fadnavis
| Updated on: May 13, 2026 | 11:56 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोनं खरेदी करु नका असं देशवासियांना आवाहन केलं आहे. त्याशिवाय पेट्रोल-डिझेल बचतीचं आणि वर्क फ्रॉम होमचं आवाहन केलं आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या आवाहनाला भाजप शासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताफ्यातील वाहनं कमी केली आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची बचत होईल. सुरक्षेसाठी जितकी गरज आहे, तितकीच वाहनं ताफ्यात राहतील असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. महाराष्ट्र सरकारने पेट्रोल-डिझेल बचतीसाठी लगेच पावलं उचलली आहेत. सरकारी कामकाजासाठी विमान प्रवास करायचा असेल तर मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी घेणं बंधनकारक असेल असा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ (WFH) संस्कृतीला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं आहे. “ज्या संस्थांमध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी काम करतात, त्यांना आठवड्यातून दोन दिवस WFH करु द्यावं, त्यासाठी राज्य सरकार एडवायजरी जारी करणार आहे. राज्य सचिवालयातील 50 टक्के अंतर्गत बैठका वर्चुअल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी स्वत:सह राज्यातील मंत्र्यांच्या वाहन ताफ्यात 50 टक्के कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींना आठवड्यातून एकदिवस पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करण्याचं आवाहन केलं आहे”

वाहन रॅली होणार नाही

“पंतप्रधानांच्या आवाहनानंतर राष्ट्रहितासाठी मध्य प्रदेश सरकार पेट्रोल-डिझेलचा कमीत कमी वापर करण्यासाठी कटिबद्ध आहे. पुढील आदेशापर्यंत माझ्या ताफ्यात कमीत कमी वाहनं असतील. त्याशिवाय कुठलीही वाहन रॅली होणार नाही” असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी म्हटलं आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं?

“विभागीय कामकाजासाठी आम्ही कमीत कमी वाहनांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅबिनेटमधील माझे सर्व सहकारी, भाजपचे आमदार, लोकप्रतिनिधी, दिल्ली सरकारचे सर्व अधिकारी कमीत कमी वाहनाचा वापर करतील. कारपूल आणि सार्वजनिक परिवहनाला प्राधान्य देतील” असं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी म्हटलं आहे.

 

Follow Us