AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लग्नानंतरही पार्टनरने चीट केले तर त्याला चूक समजू नका, लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचे खळबळजनक विधान

नेटफ्लिक्सवरील 'लॉक अप' 2 या शोचा दुसरा सीझन सतत चर्चेचा भाग बनत आहे. आता शोमध्ये राम कपूर आणि आकंक्षा चामोलामध्ये एक वाद रंगला. ज्याचे व्हिडिओ सोशलल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

'लग्नानंतरही पार्टनरने चीट केले तर त्याला चूक समजू नका, लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचे खळबळजनक विधान
ram kapoor
| Updated on: Jun 30, 2026 | 3:37 PM
Share

नेटफ्लिक्सवरील ‘लॉक अप’ या शोचा दुसरा सीझन चर्चेत आहे. या शोमधील स्पर्धकांमध्येही जोरदार वादविवाद सुरू आहेत. सध्या, राम कपूर आणि आकांक्षा चमोला यांच्यात लग्न, विश्वास आणि विश्वासघात यावर जोरदार वाद झाला. अभिनेता राम कपूर म्हणाले की, “जर एखाद्या जोडप्यात चुकून विश्वासघात झाला आणि त्यांना नात्याला दुसरी संधी द्यायची असेल, तर ते नाते संपवण्याचे कारण असू नये. त्यांची सह-स्पर्धक आकांक्षा चमोला यांनी राम कपूर यांच्या या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला  शो दरम्यान, राम कपूर म्हणाले की, “दीर्घकाळ टिकलेल्या विवाहांना कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते आणि केवळ एका चुकीमुळे जोडप्यांनी नाते संपवण्याची घाई करू नये.”

लग्नाबद्दल बोलताना राम म्हणाला, “जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर खरं प्रेम करत असाल, तर नातं तोडण्याचं कोणतंही कारण असू शकत नाही. लग्न अवघड असतं आणि तो एका प्रवासासारखा असतो. तुमचं लग्न टिकवण्यासाठी तुम्हाला दररोज प्रयत्न करावे लागतात. त्यात चढ-उतार, चांगले-वाईट दिवस, खंबीर आणि कमजोर क्षण येतात. वाईट काळात चुकून काही घडलं आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराशिवाय किंवा मुलांशिवाय जगू शकत नसाल तरी, वेळ सर्व जखमा भरून काढते आणि नातं तोडण्याचं कोणतंही कारण असू शकत नाही.”

View this post on Instagram

A post shared by 💗 (@taleoflovee)

आकांक्षा चमोलाने राम कपूरच्या मताशी असहमती दर्शवत म्हटले की, “बेवफाईला चूक मानले जाऊ शकत नाही. पण सर, हे चुकून घडत नाही.” रामने उत्तर दिले, “कधीकधी हे चुकून घडतं.” आकांक्षा पुढे म्हणाली, “ही चूक नाही. जेव्हा तुम्ही शारीरिकरित्या कोणाच्या जवळ असता, तेव्हा ती एक प्रक्रिया असते. तुम्हाला दुसऱ्याचे कपडे काढावे लागतात, स्वतःचे कपडे काढावे लागतात आणि मग ते करावे लागते. हे चुकून घडले असे तुम्ही म्हणू शकत नाही. असं नाही की माझ्या हातात चुकून चाकू आला आणि मी त्याला भोसकले.”

राम कपूर आणि आकांक्षा यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, रितेश देशमुख आणि फराह खान यांनी होस्ट केलेल्या या शोमुळे स्पर्धक आणि त्यांच्या कृत्यांविषयी बरीच चर्चा निर्माण झाली आहे. राम कपूर ‘कसम से’ आणि ‘बडे अच्छे लगते हैं’ यांसारख्या टीव्ही मालिकांसाठी ओळखले जातात आणि त्यांनी ‘स्टुडंट ऑफ द इयर’, ‘हमशकल’ आणि ‘मेरे डॅड की मारुती’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. आपल्या टीव्ही कामासाठी ओळखली जाणारी आकांक्षा चमोला, अलीकडेच चर्चेत आली होती, जेव्हा तिने खुलासा केला की ती आणि तिचा पती, अभिनेता गौरव खन्ना, घटस्फोट घेत आहेत आणि गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत आहेत.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा